Android app on Google Play

 

लालसेने लपवली मूळ कथा

 

भारतीय सनातन परंपरेमध्ये कोणत्यागी मंगल कार्याची सुरुवात भगवान गणेशाच्या पूजनाने आणि त्या कार्याची पूर्णता भगवान सत्य नारायणाच्या कथा श्रवणाने मानली जाते. स्कंदपुराणाच्या रेवाखण्ड पासून या कथेचे प्रचलित रूप घेण्यात आले आहे. परंतु भविष्य पुराणाच्या प्रतिसर्ग पर्वात या कथेला विशेष रोचक ढंगाने प्रस्तुत करण्यात आले आहे.

    शतानंद ब्राम्हणाची कथा
    चंद्रचूड राजाचे आख्यान
    लाकूडतोड्याची कथा
    साधू वणिक आणि त्याच्या जावयाची कथा
    लीलावती आणि कलावतीची कथा
या पाचही कथांचे कथासार हेच आहे की सत्यनारायण व्रत-कथा श्रावण केल्यामुळे मनुष्याच्या साऱ्या अडचणी दूर होतात आणि जीवनातील सर्व इच्छांची पूर्तता होते.


अनेक प्रकारच्या चिंता, विवंचना आणि कमतरता यांनी ग्रासलेला मनुष्य जर अशा एखाद्या धार्मिक पुस्तकातून सर्व समस्या सुटण्याचे वाचन, एवढा सोपा उपाय जर मिळत असेल तर कोणतीही हमी नसताना देखील तो उपाय करण्यास असा मनुष्य नक्कीच उद्युक्त होतो.
एका कथा वाचणाऱ्या पुरोहिताला बोलावून, २ तास हात जोडून बसून आणि थोडीशी दक्षिणा देऊन आणि प्रसादाचा खर्च करून जर जीवनातील अडचणी दूर होण्याची थोडी जरी शक्यता असली तर असा उपाय कोण करणार नाही? धार्मिक कर्म केल्याने समाजात देखील प्रतिष्ठा वाढते. आदर मिळतो. त्यामुळे या पूजा आणि कथेचा व्यवसाय चांगलाच वाढत चालला आहे.

परंतु आपल्या ऋषीमुनींनी सत्यनारायण व्रत-कथा केवळ ऐकण्यापेक्षा त्यामध्ये निरूपीत मूल सत्‌ तत्व परमात्म्याची आराधना आणि पूजा यांच्यावर जोर दिला होता. गीतेमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की ‘नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः’. अर्थात या महामाय दुःखद संसाराची वास्तविक सत्ता नाहीये. परमेश्वर हे एकाच त्रिकालाबाधित सत्य आहे आणि तोच एकमात्र ज्ञेय, ध्येय आणि उपास्य आहे. ज्ञान, वैराग्य आणि भक्तीच्या माध्यमातून तोच साक्षात्कार करण्या योग्य आहे.


सत्यव्रत आणि सत्यनारायणव्रत यांचे तात्पर्य त्या शुद्ध सच्चिदानन्द परमात्म्याशी तादात्म्य स्थापन करणे हेच आहे. संसारात मानिशांकडून सत्य तत्व शोधाची गोष्ट निर्दिष्ट आहे जिला मिळवून मनुष्य सर्वस्वी कृतार्थ होतो आणि सर्व आराधना त्याच्यातच परावर्तीत होतात. निष्काम उपासनेमुळे सत्यस्वरूप नारायणाची प्राप्ती होते.

प्रतिसर्ग पर्वाच्या २४ व्या अध्यायात भगवान सत्यनारायणाचे व्रताला देवर्षी नारद आणि भगवान विष्णू यांच्यातील संवादाच्या रुपात कलियुग आणि मृत्युलोकातील प्राण्यांच्या अनेकानेक क्लेश, त्रास आणि ताप यांनी दुःखी असलेल्या जीवनाचा उद्धार आणि त्यांच्या कल्याणाचा श्रेष्ठ आणि सुगम उपाय सांगितलेले आहे. भगवान नारायण सतयुग आणि त्रेतायुगात विष्णू रुपात फळ प्रदान करतात आणि द्वापार र्युगात अनेक रूपे धारण करून फळ प्रदान करतात. परंतु कलियुगात सर्वव्यापक भगवंत प्रत्यक्ष फळ देतात.