भविष्य पुराणाचे प्रकाशन
आधी या पुराणामध्ये पन्नास हजार (५०,०००) श्लोक विद्यमान होते, परंतु श्राव्य परंपरेवर निर्धारित राहणे आणि लिखित स्वरुपात योग्य संरक्षण न मिळणे यामुळे आज फक्त अठ्ठावीस हजार (२८,०००) श्लोकच उपलब्ध आहेत. त्यामुळे एक गोष्ट उघड आहे की विद्वान अजूनही त्या अद्भुत आणि विलक्षण घटना आणि त्यांचे ज्ञान यापासून वंचित आहेत ज्या पुरणाच्या हरवलेल्या अर्ध्या भागात वर्णन केलेल्या असतील. नशिबाने आता गीता प्रेस, गोरखपूर यांच्यातर्फे अनेक वैदिक आणि पौराणिक ग्रंथांचे संचयन, संरक्षण, परिमार्जन आणि प्रकाशन करण्यात येते जे या धर्मपरायण देशाचा अमुल्य ठेवा आहे. मूळ संस्कृत सोबतच हिंदीमध्ये अनुवाद आणि टीका प्रकास्षित करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे.या ग्रंथाच्या संपूर्ण सामग्रीचा उल्लेख इथे करणे शक्य नाही, परंतु आपण इथे ४ पर्वांत विभाजित या पुराणातील काही लोकप्रिय आणि जनश्रुत कथा, पौराणिक पात्र, व्यक्तींचा उल्लेख करणार आहोत ज्यांच्या बाबतीत आपण सामान्य बोलताना, रिती रिवाजांचे पालन करताना, आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक दिनक्रमात, साहित्य अभ्यासताना नेहमी ऐकत आलो आहोत.