Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका

https://easypuja.in/Images%5CProducts%5C204%5CSatyanarayan-Katha-.jpg

हिंदू परीवारांत सत्य नारायणाची कथा कोणाला माहित नसेल? काही तर प्रत्येक पौर्णिमेला या कथेचे आयोजन करतात. भटजी सत्यनारायणाची पोथी उघडून वाचतात आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी शंख वाजवतात. कथेच्या शेवटी यजमानाला सर्वांत आधी प्रसाद मिळतो. त्यानंतर सर्व उपस्थितांना पंचामृत, मोहनभोग, पंजिरी इत्यादी प्रसाद वाटण्यात येतो. शहरात देखील शेजारी पाजारी कुठे काठेच्चे आयोजन असेल तर तिथे उपस्थिती लावण्याची पद्धत आहे. परंतु अनुभव असा आहे की या कथेच्या विषयवस्तूच्या बाबतीत माहिती करून घेण्याचा प्रयत्न खूपच कमी लोक करतात. कथेला स्वतः उपस्थित राहून प्रसाद प्राप्त करणे यालाच अधिक महत्व दिले जाते. मानसिक उपस्थिती बहुधा नसतेच. या कथेचा मूळ स्त्रोत भविष्य पुराण आहे. हे त्याच्या प्रतीसार्गाच्या २३ ते २९ अध्यायात वर्णीत आहे. परंतु भविष्य पुराणात आणखी देखील बर्याच गोष्टी आहेत ज्या आश्चर्य चकित करतात.