Android app on Google Play

 

अनुभव - ३

 

http://www.freecdtracts.com/images/HEAVENLYTHRONE.jpg

६९% केसेस मध्ये लोकांना आपल्या आजूबाजूला एक असामान्य प्रेमाची भावना असल्याचा अनुभव येतो, तिथे त्यांना मानवी आकाराचे प्रकाशाने भारलेले काही प्राणी दिसतात, अनेकांची श्रद्धा आहे की हे प्राणी म्हणजे त्यांचे प्रियजन होते. काही लोक अशा ठिकाणी पोचतात जिथे त्यांना खूप सारा आनंद आणि प्रेम यांची जाणीव होते. त्यांना पृथ्वीवरील जीवनापेक्षा इथले जीवन अधिक खरे वाटते. त्यांना वाटते कि मानव शरीर असणारे जीवन म्हणजे एक स्वप्न होते आणि इथे खरे सत्य आहे. काही लोक देवाला भेटून परत आल्याचे सांगतात. काही लोकांना अनुभव आला की ते प्रकाशाने भरलेले प्राणी त्यांना सांगतात की तुझी अजून इथे यायची वेळ आत्ता झालेली नाही, तुला अजून खूप कामे करायची आहेत, त्यामुळे तुला परत जावे लागेल. काही लोक भविष्याची झलक पहिल्याचा दावा करतात तर काही लोक असीमित ज्ञान प्राप्त केल्याचा दावा करतात.