कलियुगाची सुरुवात
कलियुगाची सुरुवात कधी आणि कुठे झाली याचे नीटसे वर्णन करता येणार नाही. खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या अनुसार कलियुग ईशाच्या जन्माच्या ३२०१ वर्षांपूर्वी सुरु झाले आहे.
हिंदू धर्मानुसार कलियुगात जेव्हा पाप सर्व हद्द पार करून वाढेल तेव्हा कल्की भगवान स्वतः या धरतीला पापमुक्त करण्यासाठी अवतार घेतील.
नीटशी कल्पना करता येत नाही, परंतु जर कलियुगाची सुरुवात ५ ते ६ हजार वर्षांपूर्वी मानली तर अजून त्याच्या अंताला जवळपास ४ लाख वर्ष बाकी आहेत. दुसरीकडे वैज्ञानिकांचे देखील म्हणणे आहे की ३ ते ४ लाख वर्षांनी पृथ्वी अजिबात निवास योग्य राहणार नाही. याचे एक कारण पृथ्वीचे जास्तीत जास्त सूर्याजवळ जाणे हे देखील असू शकेल.