अश्वत्थामा
तो एका गुरूचा मुलगा होता तरीही क्षत्रियाचं आयुष्य जगायचा. त्याला कृष्णाने शाप दिला होता कारण त्याने पांडवांच्या वंशाला झोपेतच संपवलं होतं आणि उत्तराच्या बाळालाही गर्भातच मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला जगाच्या अंतापर्यंत अतिशय दुःखद आयुष्य जगावं लागण्याचा शाप मिळाला आहे. त्याला गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहिलं गेल्याचं आणि त्याच्या डोक्यातून सतत रक्त वाहत असल्याचं म्हटलं जातं.