समस्या....
जर आपण भूतकाळात जाऊन महात्मा गांधींना वाचवले तर आपण आणखी कोणता तरी भूतकाळ वाचवत असू, आपले गांधी तरीही मृतच राहतील. महात्मा गांधींना वाचवल्यामुळे ब्रम्हांड दोन भागात विभागले जाईल, एक ब्रम्हांड ज्याच्यामध्ये गांधींची हत्या झालेली नाही आणि दुसरे आपले मौलिक ब्रम्हांड जिथे गांधींची हत्या झालेली आहे. याचा अर्थ असा नाही की की आपण एच जी वेल्स याच्या समय यानात प्रवेश करून काळाची यात्रा करू शकतो. अजूनही खूप अडथळे आहेत.
पहिली मुख्य समस्या आहे उर्जा! एखाद्या कार साठी जसे पेट्रोल लागते तसेच समय यानासाठी देखील खूप जास्त प्रमाणात उर्जा लागेल. इतक्या प्रमाणात उर्जा प्राप्त करण्यासाठी आपल्याला एखाद्या ताऱ्याची संपूर्ण उर्जा वापरण्याची पद्धत शोधली पाहिजे किंवा असाधारण पदार्थ जसे ऋणात्मक पदार्थ (Negative mattter) म्हणजे असा पदार्थ जो गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेर जाईल, खाली पडणार नाही, तो शोधावा लागेल किंवा ऋणात्मक उर्जा (Negative energy) चा स्त्रोत शोधावा लागेल. ( असे मानले जात होते की ऋणात्मक उर्जा असंभव आहे परंतु ऋणात्मक उर्जेचे प्रायोगिक सत्यापन केसिमीर प्रभाव (casimie effect) मुळे झालेला आहे. ऋणात्मक उर्जेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन किमान पुढची काही शतके तरी शक्य नाही. ऋणात्मक पदार्थ आजपर्यंत सापडलेला नाही. ऋणात्मक पदार्थ म्हणजे प्रतिपदार्थ (antimatter) किंवा कृष्ण पदार्थ (Dark matter) नाहीत.
या व्यतिरिक्त समस्या स्थिरतेची देखील आहे. केर चे ब्लेक होल अस्थिर असू शकते, ते कोणाच्या प्रवेस्ध करण्याच्या आधीच बंद होऊ शकते. क्वांटम चे अंतराळातील भूयार् देखील कोणाच्याही प्रवेश आधीच बंद होऊ शकते. दुर्भाग्याने आपले गणित शास्त्र अजून एवढे विकसित झालेले नाही की जे या अंतराळातील भूयारांच्या स्थिरतेची गणना करू शकतील, कारण यासाठी आपल्यायला "थिअरी ऑफ एव्हरीथिंग" पाहिजे जी क्वांटम आणि गुरुत्वाकर्षण सिद्धांताला एकत्र करू शकेल. आतापर्यंत "थिअरी ऑफ एव्हरीथिंग" चा एकाच पत्र सिद्धांत आहे सुपरस्ट्रींग थिअरी. हा एक असा सिद्धांत आहे जो चांगल्या प्रकारे मांडलेला नक्कीच आहे परंतु त्याचे सोल्युशन अजून पर्यंत कोणाकडेही नाही.