Android app on Google Play

 

गणितज्ञ राय केर

 


१९६३ मध्ये न्यूझीलंड च्या एका गणितज्ञ राय केर याने फिरणाऱ्या काळ्या विवरासाठी आईन्स्टाईन च्या समीकरणांचे सोल्युशन काढले. या सोल्युशन चे काही विचित्र गुणधर्म होते. त्याच्या नुसार फिरणारे हे विवर एका बिंदूच्या रुपात संकुचित नसून एका न्युट्रान च्या फिरणाऱ्या वाल्याच्या रूपात असेल. हे वलय इतक्या वेगाने फिरेल की अपकेंद्री बल (centrifugal force) त्याला एका बिंदूच्या रुपात संकुचित होऊच देणार नाही. हे वलय एक प्रकारे एलीस च्या आरशा सारखे असेल. या वलयात जाणारा व्यक्ती मारणार नाही तर दुसऱ्या ब्रम्हांडात जाईल.