Android app on Google Play

 

वर्महोल्स

 


या नंतर आईन्स्टाईन च्या समीकरणांची अशी शेकडो सोल्युशन्स काढली गेली आहेत जी काळाच्या यात्रेची किंवा अंतराळातील भुयार (Wormholes) ची कल्पना करतात. हे अंतराळातील भुयार केवळ अंतरालातीन दोन स्थानांना जोडत नाही तर दोन कालखंडाना जोडते. तांत्रिक दृष्ट्या त्यांना काळाच्या यात्रेसाठी वापरता येऊ शकते. अलीकडेच क्वांटम सिद्धांताला गुरुत्वाकर्षण सिद्धांताशी जोडण्याचे जे प्रयत्न झाले त्यांनी वर दिलेल्या विरोधाभासात थोडी आणखी माहिती दिली आहे. क्वांटम भौतिक शास्त्रात कोणत्याही वस्तूच्या एकापेक्ष्सा अधिक अवस्था असू शकतात. उदाहरण म्हणजे एक इलेक्ट्रान एका वेळी एकापेक्षा अधिक कक्षांमध्ये असू शकतो. (या तथ्यावरच सर्व रासायनिक सिद्धांत अवलंबून आहेत). क्वांटम भौतिक शास्त्रा नुसार स्क्राडीन्गर मांजर एकाच वेळी दोन अवस्थेमध्ये असू शकते, जिवंत किंवा मृत. या सिद्धांतानुसार भूतकाळात जाऊन त्याच्यात परिवर्तन केल्यामुळे जे परिवर्तन होईल त्याच्यामुळे एक समांतर ब्रम्हांड बनेल. मौलिक ब्रम्हांड हे तसेच असेल.