Android app on Google Play

 

काळाची यात्रा करणे शक्य आहे??

 


एच जी वेल्स ची कादंबरी "द टाईम मशीन" मध्ये नायक एका विशिष्ट खुर्चीवर बसतो. त्या खुर्चीला काही पेटणारे विझणारे बल्ब लागलेले असतात, काही डायल असतात, नायक डायल सेट करतो, काही बटणे दाबतो आणि स्वतःला भविष्यातील हजारो वर्षांनतरच्या काळात घेऊन जातो.त्या वेळपर्यंत इंग्लंड नष्ट झालेला असतो आणि त्या ठिकाणी मार्लाक आणि एलोई नावाचे नवीन प्राणी निवास करत असतात. ही विज्ञानाच्या एका मोठ्या झेपेची कथा आहे परंतु शास्त्रज्ञांनी काळाच्या या प्रवासाची कल्पना किंवा धारणेवर कधीही विश्वास ठेवला नाही. त्यांच्या मते ही सणकी, धूर्त अशा प्रकारच्या लोकांचे उद्योग आहेत, आणि त्यांच्यापाशी असे मानण्याला ठोस कारण देखील आहे. परंतु क्वांटम गुरुत्वबल मधील आश्चर्यजनक स्वरूपातील प्रगती या धारणेला मुळापासून हादरवत आहे.