Android app on Google Play

 

श्री उत्तरेश्वर महादेव

 


पूर्वी इंद्राने मेघांना वृष्टी करण्याचा आदेश दिला की पाऊस पडत असे. काही काळाने मेघांनी आपल्या इच्छेनुसार वृष्टी करायला सुरुवात केली ज्यामुळे पृथ्वी जलमय होऊ लागली. यज्ञ आणि होम हवन देखील बंद पडले ज्यामुळे ऋषी आणि मुनी भयभीत झाले. ऋषीमुनी आणि देवगुरु यांनी या गोष्टीची ताक्रार ब्रम्हदेवकडे केली. ऋषींची व्यथा ऐकून ब्रम्हदेवाने इंद्राला बोलावले. इंद्राने देवगुरूंना विचारले की माझ्यासाठी काय आदेश आहे? देवगुरूंनी इंद्राला पृथ्वीच्या जलमय होण्याची घटना सांगितली. यावर इंद्राने मेघांच्या राजाला बोलावले आणि त्याला समजावले. काही दिवस मेघ नियमाप्रमाणे वृष्टी करू लागले आणि नंतर अचानक प्रलय सदृश वृष्टी करू लागले. ज्यामुळे पृथ्वीवर हाहाःकार उडाला. हे पाहून देवेंद्र भगवान शंकराला शरण आले. मेघांच्या या वागण्याबद्दल सांगितले. भगवान शंकरांनी उत्तरेच्या मेघाला बोलावले ज्याच्या हाताखाली एक करोड मेघ होते. मेघाने शंकरांना आज्ञा विचारली. भगवान शंकरांनी त्याला सांगितले की तू महाकाल वनात जाऊन भगवान गंगेश्वाराची आराधना कर. ज्याने तुझा क्रोध कमी होईल आणि तुला जास्तीची वृष्टी करण्याची आवश्यकता राहणार नाही. मेघांनी आराधना केल्यावर महादेव प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि मेघाला वरदान दिले की तुझी पृथ्वीवर उत्तरेश्वर नावाने प्रसिद्धी होईल आणि महाकाल वनातील हे शिवलिंग उत्तरेश्वर नावाने प्रसिद्ध होईल.