Android app on Google Play

 

श्री पृथुकेश्वर महादेव

 
अंगराजाचा पुत्र वेन याच्या हातांच्या मंथनातून पृथु नावाचा बालक उत्पन्न झाला. पृथु महापराक्रमी आणि जगद्विख्यात झाला. पृथूच्या राज्यात यज्ञ, हवन होत नसत, मंत्रोच्चार होत नसत, सर्व प्रजा हाहाःकार करत होती. राजाने क्रोधीत होऊन त्रिलोक जाळून टाकण्याची इच्छा प्रकट केली. त्याच वेळी नारद मुनी राजाकडे आले आणि राजाला सांगितले की पृथ्वीने अन्नाचे भक्षण केले आहे, त्यामुळे तू पृथ्वीचा वध कर. राजाने पृथ्वीवर अग्नी अस्त्र सोडले ज्यामुळे पृथ्वी जळू लागली. तेव्हा पृथ्वीने गायीचे रूप घेतल आणि राजकडे येऊन त्याची क्षमा मागितली.
पृथ्वीने राजाला सांगितले की तुला जे हवे आहे ते दोहन करून प्राप्त करून घे. राजाने गाय रूपातील पृथ्वीला दोहन केले आणि हिमालयाला कडा बनवून अन्न आणि रत्न प्राप्त केले. प्रजा सुखी झाली. इकडे राजाचे लक्ष गोवधाकडे गेले. त्या पापाने दुःखी होऊन राजा आपले प्राण त्यागण्यासाठी निघाला. नारद मुनींनी राजाला सांगितले की तू अवंतिका नगरीत अभयेश्वर महादेवाच्या पश्चिमेला असलेल्या शिवलिंगाचे द्दर्शन पूजन कर, तुझे पाप धुतले जाईल आणि राजाने दर्शन घेतल्यावर तसेच झाले. राजा पृथू इथे दोषमुक्त झाला म्हणून हे शिवलिंग पृथुकेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.