Android app on Google Play

 

श्री अभयेश्वर महादेव

 


एकदा ब्रम्हदेवाला चिंता वाटू लागली की कल्पांत झाल्यावर सूर्य आणि चंद्र देखील नष्ट होणार. त्याला चिंता होती की आता सृष्टीची स्थापना कशी होणार? त्या चिंतेतूनच त्याचे अश्रू ओघळून खाली पडले आणि त्यातून हारव आणि कालकेली नावाचे दोन दैत्य उत्पन्न झाले. सृष्टीवर काहीच नव्हते म्हणून दोन्ही दैत्य ब्रम्हदेवाला मारण्यासाठी धावले. ब्रम्हदेव तिथून पळाले. त्यांनी समुद्राच्या मधोमध प्रकाश पहिला. त्यात पुरुष होता. त्यांनी त्याला विचारले की तू कोण आहेस? त्या पुरुषाने सांगितले की मी सृष्टीचा पालनकर्ता विष्णू आहे. ब्रम्हदेवाने त्याला दोन दैत्यांपासून स्वतःची रक्षा करण्यास सांगितले. तेव्हा दैत्य विष्णूला देखील मारण्यासाठी धावून गेले. ब्रम्हदेव आणि विष्णू दोघे समुद्रात लपले. इथे ब्रम्हदेवाने महाकाल वनात नुपुरेश्वर च्या दक्षिणेला असलेल्या शिवलिंगाचे दर्शन पूजन करण्यास सांगितले. विष्णू आणि बेअम्हा दोघे महाकाल वनात आले आणि इथे येऊन शिवलिंगाचे दर्शन पूजन केले.
भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी दर्शन दिले. शंकराने भितीचे कारण विचारले तेव्हा ब्रम्हाने सांगितले. शंकराने दोघांना आपल्या पोटात लपवले आणि काही वेळाने जेव्हा त्यांना बाहेर काढले तेव्हा दोन्ही दैत्य जळून खाक झाले होते. ब्रम्हा आणि विष्णू यांनी भगवान शंकराकडे वरदान मागितले की जो कोणी मनुष्य या महादेवाचे दर्शन पूजन करेल त्याला तुम्ही अभय द्याल. तेव्हापासूनच हे शिवलिंग अभयेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते की जो कोनो मनुष्य या अभयेश्वर महादेवाचे दर्शन पूजन करतो त्याला धन, पुत्र आणि स्त्री यांचा वियोग होत नाही. संसारात सर्व सुखे उपभोगुन अंती तो मोक्षपदाला जातो.