पशुपतीनाथ मंदिर – काठमांडू, नेपाळ
पशुपतीनाथ या शब्दाचा अर्थ आहे समस्त जीवांचे स्वामी. असं म्हटल जात की या मंदिराची स्थापना ११व्या शतकात केली गेली होती. वाळवीमुळे या मंदिराचे खूप नुकसान झाले होते. त्यामुळे १७व्या शतकात या मंदिराचे पुननिर्माण केले गेले. मंदिरात भगवान शिवांची चार मुखांची मूर्ती आहे. या मंदिरात भगवान शिवांच्या मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी चार दरवाजे आहेत. ते चारही दरवाजे चांदीचे बनलेले आहेत. हे मंदिर हिंदू आणि नेपाळी वास्तुकलेचे सुंदर मिश्रण आहे.