कटासराज मंदिर – चकवाल – पाकिस्तान
कटासराज मंदिर पाकिस्तानच्या चकवाल गावापासुन ४० कि.मी. अंतरावर कटास मधल्या एका पर्वतावर आहे. असं सांगितलं जात कि हे मंदिर महाभारताच्या काळातही होत. या मंदिराशी पांडवांच्या अनेक प्रसिध्द कथा जोडल्या गेल्या आहेत. कटासराज मंदिरच कटाक्ष कुंड भगवान शिवांच्या अश्रुनी बनलं आहे अशी मान्यता आहे. या कुंडाच्या निर्मिती मागे एक कथा आहे. असं म्हटल जात की जेव्हा देवी सतीचा मृत्यू झाला तेव्हा भगवान शिव त्यांच्या दुख:त इतके रडले की त्यांच्या अश्रुनी हे दोन कुंड तयार झाले. त्यातील एक कुंड राजस्थान मधील पुष्कर नावाच तीर्थ आहे आणि दुसर कटारराज मंदिरात.