अरुल्मिगु श्रीराजा कालिअम्मन मंदिर – जोहोर बरु, मलेशिया
अस सांगितल जात की या मंदिरांची निर्मिती १९२२च्या सुमारास झाली. हे मंदिर जोहोर बरुच्या सर्वात जुन्या मंदिरानपैकी एक आहे. ज्या जागेवर हे मंदिर बनलं आहे. ती भूमी जोहोर बरुच्या राजाद्वारे भारतीयांना भेट देण्यात आली होती. काही वर्षांपुर्वी पर्यंत हे मंदिर खूप लहान होत, पण आज एक भव्य मंदिर बनलं आहे. मंदिराच्या गर्भगृहात जेमतेम ३,००,००० मोती दिवाळावर चिकटवून सजावट केली गेली आहे.