सूर्यमंदिर, औरंगाबाद - बिहार
बिहार मधील औरंगाबाद जिल्ह्यातील सूर्य देवाचे देव सूर्य मंदिर हे युगानुयुगे सूर्यदेवाच्या उपासनेचे केंद्र बनलेले आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीकोनातून अतिशय प्रसिद्ध असलेल्या या त्रेतायुगातील मंदिराच्या परिसरात दर वर्षी चैत्र आणि कार्तिक महिन्यात महापर्व छठ पूजा करण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते. पश्चिममुखी सूर्यदेवाच्या मंदिराची अभूतपूर्व स्थापत्य कला ही मंदिराच्या कलात्मकतेचे भव्य दर्शन घडवते. धार्मिक मान्यतांच्या अनुसार, या मंदिराची निर्मिती स्वतः भगवान विश्वकर्माने आपल्या हातानी केली होती.
काळ्या आणि तपकिरी रंगाच्या दगडांपासून बनलेल्या या मंदिराची आकृती ओडीसा मधल्या पूरी येथील जगन्नाथ मंदिराशी मिळती जुळती आहे. मंदिराच्या निर्मितीच्या काळात मंदिराच्या बाहेर बसवलेल्या एका शिलालेखानुसार, त्रेतायुगातील १२ लाख १६ हजार वर्ष लोटल्यानंतर इला पुत्र ऐल याने सूर्यदेवाच्या मंदिराच्या निर्मितीला प्रारंभ केला होता. शिलालेखावरून समजते की या मंदिराची निर्मिती होऊन १ लाख ५० हजार वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे.
देव मंदिरात सात रथांमध्ये सूर्याच्या दगडापासून कोरलेल्या मूर्ती आपल्या तीनही रूपांमध्ये म्हणजेच उदयाचल, मध्याचाल आणि अस्ताचल या रूपांमध्ये विराजमान आहेत. संपूर्ण भारतात सूर्यदेवाचे हेच एकमेव मंदिर आहे की जे पूर्वाभिमुख नसून पश्चिममुखी आहे. या मंदिराच्या परिसरात डझनावारी मूर्ती आहेत. मंदिरात शंकराच्या मांडीवर बसलेल्या पार्वतीची दुर्मिळ मूर्ती आहे.
जवळ जवळ १०० फूट उंच असलेले हे मंदिर स्थापत्य शास्त्र आणि वास्तुकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे. याच्या निर्मितीत सिमेंट वापरलेले नाही. तर आयताकार, वर्तुळाकार, त्रीकोणाकार, गोलाकार अशा अनेक रूपात आणि आकारामध्ये कापलेले दगड एकमेकांना जोडून हे मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर अतिशय आकर्षक आहे.
देव सूर्य मंदिर दोन भागांत बनलेले आहे. पहिला भाग गाभारा, ज्याच्या वरती कमळाच्या आकाराचा घुमट आहे आणि घुमटाच्या वर सोन्याचा कळस आहे. दुसरा भाग म्हणजे मुखमंडप, ज्याच्या वरच्या बाजूला पिरामिड सारखे छत आहे आणि त्या छताला आधार देण्यासाठी नक्षीदार दगडांचा स्तंभ आहे.
तमाम हिंदू मंदिरांच्या विपरीत असलेले हे पश्चिममुखी देव सूर्य मंदिर 'देवार्क' असल्याचे मानले जाते, जे भक्तगणांसाठी आणि भाविकांसाठी सर्वात जास्त फळ देणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे आहे. लोकांच्या सांगण्याप्रमाणे या मंदिराच्या निर्मितीबाबत कित्येक दंतकथा प्रचलित आहेत. या दंतकथांमुळे एक गोष्ट नक्की लक्षात येते ती म्हणजे हे मंदिर हे अतिप्राचीन आहे. परंतु याची निर्मिती नेमकी केव्हा झाली याबाबतीत अजूनही साशंकताच आहे.
सर्वाधिक प्रचलित असलेल्या लोककथेनुसार ऐल हा एक राजा होता आणि तो कोडाने (श्वेतकुष्ठ) पिडीत होता. एकदा शिकार करण्यासाठी देव च्या जंगली भागात गेलेला असताना राजा रस्ता चुकला आणि जंगलात हरवला. रस्ता शोधत शोधत फिरताना भुकेलेल्या आणि तहानलेल्या राजाला एक छोटेसे तळे दिसले. राजा तिथे पाणी पिण्यासाठी गेला आणि आपल्या ओंजळीत घेऊन त्याने तिथले पाणी प्यायले. पाणी पीत असताना एका गोष्टीमुळे राजा आश्चर्यचकित होऊन गेला. पाणी पिताना त्याच्या शरीराच्या ज्या भागाला त्या पाण्याचा स्पर्श होत होता, त्या त्या भागावारचे कोडाचे डाग नाहीसे होत होते.
बिहार मधील औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक त्रेतायुगीन सूर्य देवाचे देव सूर्य मंदिर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक भव्यतेबरोबरच आपल्या इतिहासासाठी देखील प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की मंदिराची निर्मिती देवशिल्पी भगवान विश्वकर्मा यांनी स्वतः आपल्या हातानी केली होती. देव येथील भगवान भास्कराचे भव्य मंदिर आपले अप्रतिम सौंदर्य आणि शिल्पकलेमुळे अनंत काळापासून भाविक, श्रद्धाळू, वैज्ञानिक, मुर्तीचोर, तस्कर, तसेच सर्वसामान्य जनतेसाठी आकर्षणाचे एक केंद्र आहे.
जगातील एकमेव पश्चिममुखी सूर्यदेवाचे मंदिर
देव मंदिरात सात रथांमध्ये सूर्याच्या दगडापासून कोरलेल्या मूर्ती आपल्या तीनही रूपांमध्ये उदयाचल (सकाळ), मध्याचल (दुपार) आणि अस्ताचल (संध्याकाळ) या रूपांमध्ये विराजमान आहेत. संपूर्ण भारतात सूर्यदेवाचे हेच एकमेव मंदिर आहे की जे पूर्वाभिमुख नसून पश्चिममुखी आहे.
जवळ जवळ १०० फूट उंच असलेले हे मंदिर स्थापत्य शास्त्र आणि वास्तुकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे. याच्या निर्मितीत सिमेंट वापरलेले नाही. तर आयताकार, वर्तुळाकार, त्रीकोणाकार, गोलाकार अशा अनेक रूप आणि आकारामध्ये कापलेले दगड एकमेकांना जोडून हे मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर अतिशय आकर्षक आहे आणि आश्चर्यजनक आहे. लोकांच्या सांगण्यानुसार या मंदिराच्या निर्मितीबाबत कित्येक दंतकथा प्रचलित आहेत, ज्यावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की हे मंदिर अतिप्राचीन आहे.