Get it on Google Play
Download on the App Store

लादा महादेव टंगरा मंदिर, एडचेरो - झारखण्ड

 झारखंडमध्ये एडचोरो येथे एका पहाडी वर असलेले भगवान शंकराचे मंदिर स्थानिक लोकांमध्ये विशेष मानले जाते. लादा महादेव टंगरा या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर झारखंड ची राजधानी रांची पासून २० किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरात प्रत्येक रामनवमीला भाविक येतात आणि भगवान निळकंठाचा आशीर्वाद घेऊन जातात.



खडकावर आहेत प्रभू श्रीराम आणि सीतामाई च्या पावलांचे ठसे
भाविकांची अशी श्रद्धा आहे की वनवास कालावधीत प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण या ठिकाणी आले होते. येथील एका पहाडावर त्यांच्या पावलांचे ठसे देखील उमटलेले आहेत ज्यांची भाविक लोक पूजा करतात.



खडकावर हात फिरवल्यावर पाणी निघते
लादा महादेव टंगरा मंदिर परिसरात एक खडक आहे. या खडकाच्या बाबतीत असे म्हटले जाते की जर पूर्ण श्रद्धेने या खडकावर हात फिरवला तर त्यातून पाणी वाहू लागते. इथे येऊन भक्तगण भगवान शंकराची उपासना करतात.

महाशिवरात्री आणि रामनवमीला भरते जत्रा
वरील दोन कारणांसाठी हे मंदिर फार मानले जाते. इथे प्रत्येक महाशिवरात्री, रामनवमी तसेच श्रावण महिन्यात जत्रा भरवली जाते, ज्यामध्ये आपली मनोकामना मागण्यासाठी दूर-दूरवरून लोक येतात. या वेळी इथल्या शिवलिंगाला दुधाने स्नान घालून फुलांनी सजवण्यात येते. खास आरतीचे आयोजन करण्यात येते, आणि भक्तगण आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात.