Get it on Google Play
Download on the App Store

हनुमान मंदिर, सागरतल - ग्वाल्हेर


ग्वाल्हेर मधील एका मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीने भाविकांना आश्चर्यचकित करून ठेवले आहे. कारण या मूर्तीमधून दुधासारखा द्रव पदार्थ स्त्रवत आहे . भक्तगण याला प्रसाद समाजात आहेत आणि या कारणासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.. हा पदार्थ हळू हळू वाढून मूर्तीच्या पायांत साठतो.मूर्तीतून दूध येतंय हे ऐकल्यावर मंदिरात भाविकांची एकाच गर्दी उसळली आहे. तर एकीकडे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की हनुमानाला अर्पण केलेल्या प्रसाद किंवा पूजेच्या साहित्यापैकी कोणत्यातरी विशेष रासायनिक प्रक्रियेमुळे दुधासारखा पदार्थ बाहेर निघत आहे. वर त्यांनी असेही सांगितले की हा पदार्थ विषारी असू शकतो त्यामुळे प्रसाद म्हणून त्याचे सेवन करू नये.