Android app on Google Play

 

चित्रपट

 

स्वत: बालगंधर्व यांनी केवळ एकाच चित्रपटात काम केले. प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्वांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिका केली होती परंतु केवळ रंगमंच गाजवण्यासाठी जन्माला आलेले बालगंधर्व कॅमेऱ्याच्या समोर अभिनय करण्यात रमले नाहीत.
बालगंधर्वांच्या जीवनावर श्रीमती हेमंती बॅनर्जी यांनी माहितीपट बनवलेला आहे. या माहितीपटास इ.स. २००२ साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.


बालगंधर्वांच्या जीवनप्रवासावर नितिन चंद्रकांत देसाई यांनी ' बालगंधर्व ' या चित्रपटाची निर्मिती इ.स. २०११ साली केली. या बालगंधर्वांची भूमिका अभिनेते सुबोध भावे यांनी साकारली आहे