Get it on Google Play
Download on the App Store

बर्रा बॉय -कैमेरोन मकाउले


कैमेरोन मकाउलेचा जन्म ग्लासगो स्कॉटलैंडमध्ये झाला होता. २ वर्षांचा असताना तो आपल्या आईला सांगू लागला की तो स्कॉटलैंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील बर्रा नावाच्या बेटावरचा आहे. त्याने एक पांढऱ्या रंगाचे घर आणि एका किनाऱ्याबद्दल सांगितले जिथे विमाने उतरत असत. त्याचा एक काळा - पांढरा कुत्रा होता आणि त्याच्या वडिलांचे नाव शेन रोबर्टसन होतं. त्याचा मृत्यू वाहन दुर्घटनेत झाला होता. त्याने त्या पांढऱ्या घराचे चित्र काढले आणि आपल्या दुसऱ्या आईची आठवण येते असे सांगितले. जेव्हा तो बर्राच्या आठवणींनी उदास राहू लागला तेव्हा त्याची आई त्याला त्या बेटावर घेऊन गेली. त्यांचं विमान किनाऱ्यावर उतरलं.

 

त्यांना ते पांढऱ्या रंगाचं घर मिळालं आणि त्या परिवाराच्या फोटोन्मधून तो काळा - पांढरा कुत्रा आणि कारची ओळख पटली. परंतु कोणाला शेन नावाच्या कोणा माणसाबद्दल माहिती नव्हती. कैमेरोनला घराचे सगळे रस्ते माहिती होते आणि त्याने घरातील सगळ्या वस्तू व्यवस्थित ओळखल्या.

 

जसजसा तो मोठा होत गेला, या आठवणी विसरत गेला. पण त्याला पूर्ण खात्री होती की मृत्यू म्हणजे शेवट नाही. गस टेलरप्रमाणेच त्यानेही असेच सांगितले की एका विवरात पडल्यानंतर तो आपल्या आईच्या पोटात पोचला होता.