Android app on Google Play

 

एडवर्ड ऑस्ट्रियन

 

 

पत्रीशिया ऑस्ट्रियनच्यावर्षांच्या मुलाला पावसाळ्याच्या दिवसांची भीती वाटत असे. नंतर त्याच्या घशाला काही त्रास होऊ लागला आणि तिथे खूप वेदना होतात असं तो सांगू लागला. एडवर्डने आपल्या आईला आपल्या पूर्वजन्माबद्दल विस्तृत माहिती दिली जी बहुधा पहिल्या विश्वायुद्धातील होती. त्याने सांगितलं की गळ्याला गोळी लागू त्याचा मृत्यू झाला होता.

 

सुरुवातीला डॉक्टरना त्याच्या घशाचे दुखणे ओळखता आले नाही आणि त्यांनी त्याच्या टोनसिल्स काढून टाकल्या. त्याच्या घशात पुन्हा एक गाठ निर्माण झाली आणि डॉक्टरांकडे तिचा इलाज नव्हता. एडवर्डने आपल्या आई-वडिलांना आपल्या पूर्वजन्म आणि मृत्यू याबाबत चर्चा करायला लावली तेव्हा अपोआप ती गाठ नाहीशी झाली. डॉक्टरांनाहि समजले नाही की गाठ कुठे निघून गेली.