इमाद इलावरची गोष्ट
लेबनान येथील ५ वर्षांचा इमाद इलावर जवळच्या एका गावातील आपल्या जीवनाबद्दल सांगू लागला. लहानपणी त्याने बोललेले पहिले २ शब्द म्हणजे “जमिलेह” आणि “महमूद” आणि २ वर्षांचा असताना त्याने २ अनोळखी माणसाना घरासमोर थांबवून सांगितलं की ते त्याचे शेजारी होते. इआन स्टीवेंसन ने तो मुलगा आणि त्याचे आई - वडील यांची चौकशी केली. इमादने आपल्या पुर्वाजन्माबद्दल ५५ वेगवेगळे दावे केले.
परिवाराने स्टीवेंसनसमवेत त्या गावाला भेट दिली आणि त्यांना ते घर मिळालं जिथे राहण्याचा दावा इमाद करत होता. इमाद आणि परिवार त्यातील १३ गोष्टींची खात्री पटवू शकला. इमादने आपले पूर्वजन्मीचे काका मेहमूद आणि आपली पूर्वजन्मीची प्रेयसी जमिलेहचे फोटो ओळखले. आपण बंदूक कुठे ठेवायचो तेही त्याने सांगितले आणि एका अनोळखी इसमाबरोबर आपल्या सैनिकी आयुष्याबद्दल चर्चाही केली. एकंदरीत इमादने सांगितलेल्या ५७ पैकी ५१ गोष्टी जुळून आल्या.