पुनर्जन्माच्या सत्यकथा
शांतिदेवी
मुलांच्या पूर्व जन्माच्या आठवणींबद्दल एक उत्तम नमुना म्हणजे शांती देवी. महात्मा गांधीनी नियुक्त केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या एका समितीने त्यांची तपासणी केली होती. ते शान्तिदेविन्सोबत त्यांच्या पूर्वजन्मीच्या गावीही गेले आणि तेथील घटनांचा आढावा घेतला.
१८ जानेवारी १९०२ रोजी मथुरा येथे राहणाऱ्या चतुर्भुज च्या घरी एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव लुगडी ठेवण्यात आल. जेव्हा ती १० वर्षांची झाली तेव्हा जवळचा एक दुकानदार केदारनाथ चौबेसोबत तिचा विवाह करण्यात आला. हे केदारनाथ चं दुसरं लग्न होतं. त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. केदारनाथची मथुरा आणि हरिद्वार इथे कपड्याची दुकानं होती. लुगडी अत्यंत धार्मिक होती आणि अतिशय कमी वयात अनेक धार्मिक स्थळांना तिने भेटी दिल्या होत्या. अशाच एका तीर्थयात्रेदरम्यान तिच्या पायाला जखम झाली जिचा इलाज आधी मथुरा आणि नंतर आग्रा इथे करण्यात आला.
जेव्हा लुगडी पहिल्यांदा गर्भवती राहिली तेव्हा ऑपरेशन नंतरही तिने मृत अर्भकाला जन्म दिलं. दुसऱ्या खेपेला तिच्या पतीने तिला आग्र्यातील सरकारी इस्पितळात दाखल केले, जिथे तिने २५ सप्टेंबर १९२५ रोजी ऑपरेशन नंतर एका मुलाला जन्म दिला. परंतु ९ दिवसानंतरच लुगडीची प्रकृती बिघडली आणि ४ ऑक्टोबरला तिचा मृत्यू झाला.
लुगडीच्या मृत्युनंतर १ वर्ष १० महिने आणि ७ दिवसानंतर म्हणजे ११ डिसेंबर १९२६ रोजी दिल्लीतील चिरावाला भागात बाबू रंग बहादुर माथुरच्या घरी मुलगी जन्माला आली जिच नाव त्याने शांतिदेवी ठेवलं. ती सर्वसाधारण मुलींसारखीच होती परंतु ४ वर्षाची होईपर्यंत तिला नीट बोलता येत नसे. आणि जेव्हा ती बोलायला लागली, तेव्हा ती कोणी वेगळीच मुलगी बनली होती, ती आपल्या पती आणि मुलाबद्दल बोलू लागली. तिने सांगितलं की तिचा पती मथुरेत आहे जिथे त्याचं कपड्याच दुकान आहे आणि त्यांना एक मुलगाही आहे. ती स्वतःला चौबाइन (चौबेची पत्नी) म्हणवून घेऊ लागली. आई-वडिलांनी ती लहान असल्यामुळे तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण पुढे त्यानाही चिंता वाटू लागली जेव्हा ती पुनःपुन्हा आपल्या पतीसोबातच्या आपल्या मथुरेतील आयुष्याबद्दल बोलू लागली. अनेकवेळा जेवताना ती बोलत असे, "मथुरेत माझ्या घरात मी वेगळ्या प्रकारची मिठाई खात होते". तिने आपल्या पतीच्या ३ खुणा सांगितल्या, तो गोरा होता, त्याच्या डाव्या गालावर एक मोठा मस होता आणि तो चष्मा लावायचा. तिने हेही सांगितलं की तिच्या पतीच दुकान द्वारकाधीश मंदिराच्या समोरच होतं.
शांतिदेवी आता ६ वर्षांची झाली होती. तिच्या अशा बोलण्याने तिचे आई-वडील काळजीत पडले होते. मुलीने तर आपल्या मृत्यूची सविस्तर हकीगतही सर्वाना सांगितली होती. त्यांनी जेव्हा आपल्या चिकित्सकाला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यानाही आश्चर्य वाटलं की एवढ्या छोट्या मुलीला इतक्या गुंतागुंतीच्या ऑपरेशन च्या प्रक्रीयान्बद्दल एवढी माहिती कशी? रहस्य आणखीनच गहन होत चाललं. जसजसा वेळ जात होता तसतशी ती आपल्या आई-वडिलांना मथुरेला जाऊया म्हणून विनवण्या करू लागली. पण जवळ जवळ ८ ते ९ वर्षापर्यंत तिने आपल्या पतीच नाव सांगितलं नाही कारण तेव्हा भारतात स्त्रिया आपल्या पतीच नाव उच्चारत नसत. कोणी विचारलं तर ती लाजून फक्त एवढंच सांगायची की तिथे चला, मी त्यांना ओळखेन. एक दिवस त्यांचे एक नातेवाईक बाबू बिशनचंद जे दिल्लीच्या विद्यालयात शिक्षक होते, यांनी तिला सांगितलं की जर तू आपल्या पतीच नाव सांगितलस, तर तुला मथुरेला घेऊन जाऊ. या मोहात पडून तिने त्यांच्या कानात पंडित केदारनाथ चौबे याचं नाव सांगितलं. त्यांनी तिला सांगितलं की ते याबद्दल माहिती मिळवून मगच मथुरेला जाण्याची तयारी करतील. त्यांनी केदारनाथ चौबेना पत्र लिहून दिल्लीला येण्यास सांगितले. केदारनाथ यांनी सर्व गोष्टीना दुजोरा दिला आणि त्यांना दिल्लीतील आपल्या नात्यातील कांजीमल शांती यांना अगोदर भेटण्यास सांगितले.
कांजीमल यांच्याबरोबर एक बैठक झाली ज्यात शान्तिदेवीने त्यांना आपल्या पतीचे बंधू म्हणून ओळखले. तिने आपले मथुरेतील घर आणि त्यात पुरून ठेवलेल्या पैशांच्या बाबतीतही माहिती दिली. तिने असंही सांगितलं की तिला मथुरेला नेलं तर ती स्वतः रेल्वे स्टेशनपासून घरी जाऊ शकेल. कांजीमल यांच्या सांगण्यावरून केदारनाथ लुगडीचा मुलगा नवनीत लाल आणि आपली सध्याची पत्नी यांच्याबरोबर १२ नोव्हेंबर १९३५ ला दिल्लीला आले. शान्तिदेवीने त्याना लगेचच ओळखले आणि आपल्या आईला म्हणाली, "मी तुला म्हटले नव्हते की माझे पती गोरे आहेत आणि त्यांच्या डाव्या गालावर मस आहे?" तिने आपल्या आईला आपल्या पतीच्या आवडीची भाजी करायला सांगितले. मग केदारनाथानी अनेक प्रश्न विचारल्यावर तिने आपल्या मथुरेतील घराच्या आवारातील विहिरीचा संदर्भ दिला जिथे ती रोज अंघोळ करत असे. तिने आपल्या मुलालाही लगेचच ओळखलं, जरी ती त्याला खूपच लहान असताना सोडून गेली होती. तिने तिच्या पतीला प्रश्न विचारला की वाचन देऊनही तुम्ही दुसरं लग्न का केलं?
केदारनाथ निघून गेल्यावर शांती देवी खूप उदास झाली आणि मथुरेला जाण्यासाठी हट्ट करू लागली. गांधीजीनी नेमलेली समिती तिला मथुरेला घेऊन गेली जिथे तिने रिक्षावाल्याला सहजपणे आपल्या घराचा पत्ता सांगितला. तिथे पोचल्यावर तिने तिथल्या सर्व लोकांना ओळखलं आणि घरातील सर्व खोल्यांचा रस्ताही सांगितला. शांतीने तिथल्या सर्व जागा ओळखल्या आणि त्या जागेबद्दलही सांगितलं जिथे तिने पैसे लपवून ठेवले होते. आपल्या वडिलांच्या घरी गेल्यावर तिने आई-वडिलांना लगेच ओळखलं आणि आईला मिठी मारून खूप रडली. हे बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
आपल्या तपासणी दरम्यान केदारनाथाचा एक मित्र पंडित रामनाथ याने एक महत्त्वाची माहिती सांगितली ज्याची आम्ही बाकी माहितीशी पडताळणी करून खात्री केली. जेव्हा केदारनाथ दिल्लीला होते तेव्हा एक रात्र पंडित रामनाथांकडे राहिले होते. सगळे झोपले होते, आणि केदारनाथ, त्यांची पत्नी, नवनीत आणि शांतिदेवी एवढेच एका खोलीत होते. नवनीत गाढ झोपेत असताना केदारनाथानी शांतीला विचारलं की तिला संधिवात होता आणि ती उठू शकत नव्हती तर तिला दिवस कसे गेले होते? यावर शांतीने त्यादिवशी केदारानाथांबरोबर झालेल्या संभोगाची इत्यंभूत प्रक्रिया वर्णन केली आणि केदारनाथांची खात्री पटली की शांतीच त्याची पत्नी लुगडी आहे.
याबाबत शान्तिदेविला विचारलं असता ती म्हणाली की "याच गोष्टीमुळे त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसला."