Android app on Google Play

 

परिवर्तन चळ्वळीत काम करणार्या माझ्या बहिण... भावंडांनो !!

 

"परिवर्तन चळ्वळीत काम करणार्या माझ्या बहिण... भावंडांनो, योग्य वाटल आणि शक्य झाल तर मी आतापर्यंत जे काही लिहिल आहे त्यावर निदान विचार करा, एवढ मी तुम्हाला अंत:करणापासून विनवत आहे. अखेरीस एवढ्च म्हणेन, की जीभ हे नुसत धारदार शस्त्रच नाही, तर ते मधाच मधुर पोळ ही आहे. तो डोंगरकडे कापत कोसळ्णार उग्र प्रतापच नाही, तर डोंगरकुशीतुन झुळुझुळु वाहणारा नाजुक निर्झर्ही आहे. आवश्यक तिथ, आवश्यक तेव्हा शस्त्र जरूर चालवल पाहिजे आणि चालवाव ही. पण सदा सर्वकाळ शस्त्र घुमवण्याच्या नशेत स्वत:च शस्त्रमय, शस्त्रात्म बनू नये. योग्य तिथ, योग्य वेळी पुष्पमय, पुष्पात्मही बनाव.

हळुवार भावना हरवली, तर भेदक-छेदक तर्क घेऊन काय करायच आहे? माणस तुट्ली, तर तर्क काय स्वत:च्याच छातीत खुप्सून घ्यायचे आहेत? खर तर, कठोर तर्क प्रेमाच्या ओलाव्यात बुड्वून घ्यावा, हेच प्रगल्भ, प्रसन्न आणि प्रफ़ुल्लित मनुष्यत्वाच चिन्ह असत.

माझ्या बहिण... भावंडांनो, द्वेषाच्या दलदलीत लोळ्ण्याची चटक लागली, की प्रेमाच्या पुष्करणीकडे ढुंकूनही पहावस वाटत नाही. तुम्ही सदा न कदा कुणाचा ना कुणाचा द्वेष करीत असाल तर तुम्ही स्वत:च मुर्तीमंत द्वेष बनाल. तुमच्या काळ्जातच द्वेषाच विष भरलेल असेल, तर तुमचा उछ्वास अखंड्पणे वातावरणात द्वेषाचे परमाणूच पेरत जाणार. तुम्ही स्वत: निर्विष नसाल, तर इतरांना तरी निर्विष कसे कराल?
तुम्ही लोकांना गुलामगीरीतून मुक्त करू इच्छितात ना? मग लोकांनी काय त्यांच्या गुलामगिरीतुन सुटून तुमच्या गुलामगिरीत अडकायच? शत्रुंनी आपल्या गळ्याभोवती आवळ्लेला फ़ास दु:खद आणि मित्रांनी आवळ्लेला फ़ास सुखद, अस असत काय?

माझ्या बहिण ... भावंडांनो, मी तुम्हाला कळ्वळून सांगतो, की तुम्ही या मार्गाने जाऊ नका. सोडा ही वाट सोडा. ही वाट तुम्हाला मग्रूर, बेदरकदार, बेजबाबदार बनवणार आणि तुम्च्यावर विश्वास ठेवणार्यांचाही घात करणार.

काटेरी तर्क चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी आणि चुकिच्या पद्धतीनं वापरले, तर ते तुमच्य हृदयात निरागस फ़ुलपाखरांना जगूच देणार नाहीत अणि इतरांच्या हृदयातल्या निष्पाप, नाजुक, नितांत सुंदर फ़ुलपाखरांनाही मारून टाकणार! आणि आपण हृदयातली फ़ुलपाखर अशी गमावली, तर आपल्या काळ्जात नुसते सुर्वंट्च उरतील ना! नाही, अस होऊ द्यायचं नाही. आपण फ़ुलपाखर जपायचीच.!

लेखं - डॉ.आ.ह.सालुंखे