Android app on Google Play

 

आत्महत्या करण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी खास !!

 

काल रात्री बातम्या पाहताना एक बातमी वाचली आणी खुप आनंद झाला आणी समाधान ही वाटल , ती बातमी अशी होती "पुण्यामध्ये गेल्या ४८ तासाच ९ लोकांच्या आत्महत्या". खरचं ही बातमी ऎकताच खुप समाधान वाटल कारण या भुमी वरून कमकुवत मनाच्या , भित्र्या लोकांची संख्या कमी होऊन या भुमीचा भार तरी कमी झाला.

रच अश्या लोकांना जगण्याचा काय अधिकारच नाही , त्यापेक्षा ही मध्येच गेलीत ते बर झाल , काय उपयोग तरी काय यांचा जगुण ? यांच्या हातुन काही होणारच नव्हत त्यापेक्षा मेलीत तेच बर झाल , पण ही बातमी ऎकताना पाहताना दुख: यांच गोष्टीच झालं की , यात बहुंताश शिकली सवरलेली लोक होती अगदी आयटी क्षेत्रापासुन ते इंजिनियर क्षेत्रातील अगदी २२ वर्षाची मुला-मुलींचा समावेश होता यात. खरच हे ऎकुनच जास्त दुख: झाली कि इतकी शिकलेली ही मुल , खरच सज्ञानी झालेत का ? शिक्षित होणे आणी सुशिक्षित होणे यात खुप फ़रक आहे हेच आज यामुळे परत एकदा सिध्द झाले आहे. खरच आजच्या या २२ वर्षाच्या मुलांना कसलं आलय टेन्शन की आत्महत्या करावी लागली ? यांच्या मनात हे विचारे येतातच कसे ? मित्रानो आत्महत्या करण्यापुर्वी जरा अनेक गोष्टीचा विचार या लोकांनी केला पाहिजे . खरच का हो आपल्यालाच जगात दुख: आहे का? "जगी सुखी असा कोण आहे. विचारी मना तुच शॊधुन पाहे." या संत उक्तीचा कधी आपण विचार करणार आहोत की नाही ?

अरे मित्रानो-मैत्रिणीनो आपल्यालाच दुख: आहे असे म्हणणारे जे महाभाग आहेत त्यांना मी एक विंनती करीन की एकदा तुम्ही तुमच्या विश्वाच्या बाहेर डोकावा , ज्यांनी ज्यांनी आत्महत्येचा विचार करत आहेत त्यांनी त्यांनी आत्महत्या जरुर करा माझा त्याला विरोध नाही पण ति आत्महत्या करण्यापुर्वी एकदा एक दिवस असा निवडा की तुमच्या आसपांसच्या शहरात एक फ़ेरफ़टका मारा , अनेक मंदीरांच्या बाहेर बसलेले अपंग , हात पाय नसलेले , शरीराची बोट झडलेली , डोळे नसणारे, सरपट चालणारे , अगदी उन्हात ही ज्यांना पुढे सरकता येत नाही असे वेदनेने विव्हळ्णारे, जन्मजात अपंगत्व असणारी लोक पहा, ते पाहुन झाल की तिथुन पुढे एखाद्या अनाथ आश्रमात जा , तिथ जा आणी त्या मुलांच्या थोड मिसळा कारण अस ही तुम्ही आत्महत्या करणारच आहात तर जाता जाता त्यांच्यात मिसळ्याचा आनंद का सोडता ? त्यां मुलांची थोडी चौकशी करा , तर अस आढळेल की अनेक मुलांना तिथ कस आणल गेलय , कोणाला लहानपणीच अस बाहेर टाकुन गेल होत , कोणाचे आई वारली तर कोणाचे आई बाबा दोघे ही नाहित , कोणाचे आई वडील अपघातात गेले तर कोणाचे कसे ? कोणा-कोणाला त्यांच्या आई बापाचे तोंड ही पाहिले नसेल असे असतील, काही काही मुल अशी असतील कि त्यांना त्यांच्या बापाचे नावच माहीती नसेल अशी अनेक वेश्याची मुल ही तिथ असतील अशा अनेक सांगता न येणारे अनुभव येतील तिथ नक्कि जा ! ते सगळ पाहुन झाल ना की त्याच शहरातील मंतिमंद मुलांच्या शाळेत ही जा कारण कस आहे अस आणी तस ही मरण्याचा विचार पक्क्का केलांच असल्यामुळे जाता जाता ते ही करा नाही तर ते राहील अशि रुकरुक तुमच्या मनालां नको , म्हणून तिथ ही जा आणी एक्दा पहा , त्या निसर्गाने देवाने त्यांना मंद बुध्दी देऊन ही ही मुल आज कशी जगत आहेत , भले तुमच्या इतकी बुध्दी नसेल ही पण तरी ही ते अतिशय उतम रितीने जिवन जगत आहेत ते एकदा बघा , अशि बरीच ठिकाणी फ़िरलात ना की एका शांत अशा बागेत , किंवा झाडाखाली बसुन एकदा विचार करा, की अरे यांच्यापेक्षा आपण किती नशिबवान आहोत याचा एकदा सखोल विचार करा .

अरे यांच्यपेक्षा किती गोष्टी या निसर्गाने आम्हांला दिल्या आहेत , यांच्यापेक्षा अनेक पटीने आम्ही सुखात आहोत , दोन वेळच जेवन योग्य वेळी भेटत आम्हाला , सगळ सगळ काही आहे आणी तरी ही जर मरायच पक्कच केल असेल तर मित्रानो मरा पण अस मरा की लोकांच्या लक्षात राहीला पाहीजेत , अगरबत्ती स्वत: जळते पण जाता जाता इतरांना सुंगध देऊन जाते तसा जळा ! अरे पैसा मिळवणे ,चिमणा चिमणिचा संसार करणे हे तर सगळेच करतात अगदी कुत्री मांजरही या ना त्या प्रकारे प्रंपच करतच असतात पण जगाच्या तेच लक्षात राहतात जे जगासाठी जगतात आणी जगासाठी मरतात त्यांचीच दखल घेतली जाते . नाही तर या भुमीत शिवाजी , तुकाराम अशा नावाची किति तरी माणस जन्माला आली आणी गेली आहेत पण दखल फ़कत दोघांचीच घेतली जाते , मातीत तर सगळेच जाणार आहेत , पण जे मातीसाठी मातीत जातात तेच लोकांच्या डोक्यात राहतात , अरे अस ही जे आत्महत्या करण्याचा विचार करत आहे त्यांना भले जास्त काहि करता आले नाही तर निदान सिमेवर जाऊन अतिरेक्यांची गोळी खाऊन तरी मरा निदान परिकियांची एक गोळि आपण बाद केली याच तरी समाधान लाभेल , मरा पण अस मरा की लोकांनी विसरल नाही पाहिजे , आणी जर मरायच रद्द करत असाल तर एक सुत्र जिवनात नेहमी लिहुन ठेवा , हे सुत्र अस आहे की या नुसार जर तुम्ही जगलात तर तुमच्या सारखा सुखी कोणी नाही. "लहानाकंडे पाहुन जगा ,मोठ्यानकडे पाहून प्रगती करा , चांगल्यासाठी नेहमी प्रयत्न करा आणी वाईटासाठी सदैव तयार रहा "

रचं हे सुत्र आत्मसात जर केले तर नक्कीच तुमच्या जिवनात खुप खुप फ़रक पडेल याची खात्री आहे मला , आपल्या पेक्षा कमी असणा-या लोकांकडे पाहून जगा , जर आपल्या कडे मोटार सायकल असेल तर नुसत्या सायकलवाल्याकडे पाहून समाधान मान , कारवाल्या कडे पाहत बसलात तर मोटारीचा ही आंनद उपभोगता येणार नाही , आपल्याला काही आजार असेल तर आपल्यापेक्षा जास्त मोठा आजार असणाऱ्या व्यक्तिकडे पाहुन जगा मग समजेल तुम्ही कीती भाग्यवान आहात ते , मोठ्यांकडे पाहुन प्रगति करा , आज पर्यंत जी जी मोठी माणस होऊन गेली त्यांचे नुसते चरण धरण्यापेक्षा त्यांचे आचरण ही धरा , ते अनेक मोठया अडचणीना ते कसे सामोरे गेले याचा अभ्यास करा , आपण चालत असताना वाटेत जर डोंगर आडवा आला तर आपन कुंद्ळ फ़ावड घेऊन तो डोंगर नष्ट करतो का ? शहाणी माणसं या भानगडीत पडत नाहीत उलट ते त्या डोंगरावर चढतात आनी तो पार करुन आपल्या इच्छित स्थळी पोहचतात अगदी तसच आपण त्यांच्याकडे पाहून प्रगती केली पाहीजे , जे जे उत्कठ ते ते घ्यावे या प्रमाणे चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करा , या सुत्रावर परत कधि तरी सविस्तर लिहीन , सध्या वेळे अभावी थांबतो इथे , पण मित्रांनो यावर विचार जरुर करा इतकीच मनापासुन आशा .

लेख - विवेक सिद.(कोल्हापूर)