Android app on Google Play

 

'देव देवळांच्या निमित्ताने…

 

''देव देवळांच्या निमित्ताने अब्जावधी रुपयांची संपत्ती हिंदुस्थानात निष्कारण अडकून पडलेली आहे.आणि इकडे आमच्या भारत राष्ट्राचा पाय आंतरराष्ट्रीय कर्जाच्या बिनबुडाच्या खळग्यात खोल-खोल जात आहे. या परिस्थितीचा एकाही मुत्सद्द्याने किंवा संताने विचार केलेला दिसत नाही.

अनाथ बालकाश्रम , अनाथ विधवाश्रम , गोरक्षण , कुष्ठरोगी लंगडे-पांगळे यांचे आश्रम,मागासलेल्या समाजातील मुलामुलींचे शिक्षण , कितीतरी समाजजीवनाच्या जगण्यामरण्याचे प्रश्न आहेत. ते सोडवणाराना घरोघर दारोदार भीक मागावी लागते आणि देव आणि देवळांच्या दगडी प्रतिष्ठेसाठी करोडो रुपयांची संपत्ती शतकानु-शतके तळघरात गाडलेली रहाते, या नाजूक मुद्द्याचा आजवर एकालाही घाम फुटलेला नाही.''

- प्रबोधनकार ठाकरे. (धर्म आणि धर्माची देवळे)