Get it on Google Play
Download on the App Store

हुंडा !!

स्वांतत्र्य मिळून आता साठ वर्षांहून अधिक काळ उलटलाय. तरी देशातल्या अनिष्ठ रुढी काही केल्या कमी होत नाहीत हुंडा घेणं आणि देणं ही त्यापैकीच एक.

हुंडा जेव्हढा जास्त घेईल त्याला तेव्हढी सामाजिक प्रतिष्ठा असी भिकारचोट पद्धत निर्माण झाली आहे.

शेतकरी मुलगा असेल तर एकर ला १ लाख हुंडा या प्रमाणे हुंडा घेतल्या जातो..

शिक्षक मुलगा असेल तर त्याला ९ ते १३ लाख पर्यंत हुंडा दिला घेतला जातो..

डॉक्टर असेल तर २० ते ५० लाख पर्यंत हुंडा तसेच १० लाख हुंडा आणि हॉस्पिटल साठी जागा इत्यादी ची मागणी पण केली जाते...

अशा प्रकारे आर्थिक आणि सामाजिक दर्जा जसा त्याप्रमाणात हुंडा असे एक समीकरण सुरु आहे .....

आता हुंडा पद्धत थांबविणे आवश्यक आहे ..... हुंड्याच्या भीतीमुळे मुलीचे बळी दिले जात आहेत ...

जे कोणी हुंडा मागेल त्याला मुलगी देऊ नये .....त्याला सर्व समाजाने चांगला धडा शिकविणे आवश्यक आहे ......

हुंडा पद्धत हि कायद्याने गुन्हा असून चालत नाही तर हुंडा घेणे आणि देणे हा सामाजिक गुन्हा केला पाहिजे... सर्व समाजाने याला गुन्हा मानायला हवे...जे गुन्हेगार आहेत त्यांचे आयुष्यभर लग्ने झाली नाही पाहिजेत त्यांना तीच अद्दल असेल.

आमीरच्या ‘सत्यमेव जयते’ या शो मधून याच अनिष्ठ रुढीला वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला. आमीरने समाजाच्या विविध स्तरातल्या हंड्यासाठी नडल्या गेलेल्या महिलांच्या कहण्या आपल्या शो वर दाखवल्या. समाजात शिकून सवरून मोठ्या हुद्यावर काम करणाऱ्या, मुख्य म्हणजे लोकांना नीतीमत्तेच्या गोष्टी सांगणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या या कहाण्या होत्या. आमीरनं आपल्या शो मधून कमी खर्चात लग्न कशी उत्तम होऊ शकतात यांचं उदाहरण दिलं.

जो मुलगा हुंडा घेत असेल मी त्याला षंडचं बोलेल...मुलीनी ही आपल्या माय-बापानां सांगा मी हुंडा घेणाऱ्या मुलासोबत लग्न करणार नाही...

कधीतरी जानावारांसारखे सोडून माणसाप्रमाने वागा ???

मित्र-मैत्रिणीनो हा बदल स्वतःपासून आपल्या परिवारापासून घडवा हुंडा घेवू नका मर्दा सारखे जीवन जगा लाचार होवू नका..... अरे ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचां अभिमान कसला बाळगता.चला तर मग एक नवा भारत घडवू या......

बघा माणस विकत घ्यायची कि आपुलकीने जोडायची हे तुमच्या हातात आहे...???

लेख - निलेश रजनी भास्कर कळसकर , जळगाव .
भ्रमणध्वनी- ०८१४९२००९१०