युरेनस ग्रह
युरेनस सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "व्हॉयेजर २" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. या ग्रहासाठी सध्या तरी कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही. इ.स. १९७७ साली पृथ्वीवरुन प्रक्षेपित केलेले "व्हॉयेजर २" यान जानेवारी २४ १९८६ या दिवशी युरेनसच्या सर्वांत जवळ पोहोचले. तेथुन ते नेपच्युन ग्रहासाठीच्यात्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.
युरेनसचा शोध
युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला तारा म्हणून गणले जाई. विल्यम हर्शेलला सुद्धा तो प्रथम धूमकेतू वाटला होता.
भौतिक गुणधर्म
युरेनस हा प्रामुख्याने वायु व अनेक प्रकारच्या बर्फांसमान बनलेला आहे. याच्या वातावरणात ८३% हायड्रोजन, १५% हेलीयम, २% मिथेन व असिटिलीन चे काही अंश आहेत. तर अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बन व नायट्रोजन यांची संयुगे तसेच खडकाळ पदार्थ आहेत. त्याचा हा अंर्तभाग गुरु व शनी ग्रहाच्या विरुद्ध आहे जो कि प्रामुख्याने हायड्रोजन व हेलीयमपासून बनलेला आहे.