Get it on Google Play
Download on the App Store

निर्मिती

सूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात. या सिद्धान्ताप्रमाणे ही निर्मिती एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली. हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्ष अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक तार्‍यांची निर्मिती झाली.जुन्या धूमकेतूंचा अभ्यास केला असता, त्यांच्यावर फक्त मोठ्या फुटणार्‍या तार्‍याच्या गाभ्यात आढळणारी मूलद्रव्ये सापडली आहेत. यामुळे सूर्य हा जवळपास झालेल्या तारकासमूहातील स्फोटामुळे तयार झाल्याचा निष्कर्ष निघतो. या स्फोटामुळे तयार झालेली ऊर्जा ही या तेजोमेघाच्या कोसळण्याला कारणीभूत असण्याची शक्यता आहे.

सूर्यमाला ज्या तेजोमेघापासून तयार झाली, त्याचा व्यास सुमारे ७००० ते २०००० खगोलीय एकके इतका होता, तसेच त्याचे वस्तुमान हे सूर्यापेक्षा थोडेसे जास्त (सुमारे १-१०% जास्त) होते. हा तेजोमेघ जेव्हा कोसळला, तेव्हा कोनीय बलामुळे त्याचा फिरण्याचा वेग वाढत गेला. जसेजसे त्याच्या केंद्रस्थानी वस्तुमान वाढत गेले, तसे त्याचे केंद्रस्थान इतर भागांपेक्षा जास्त गरम होत गेले. त्यानंतर त्या तेजोमेघावर गुरुत्वाकर्षण, वायूंचा दबाव, चुंबकीय क्षेत्र तसेच फिरण्याने येणारे बल, यांचा प्रभाव वाढला व तो एका तबकडीमध्ये रूपांतरित झाला. या तबकडीचा व्यास सुमारे २०० खगोलीय एकके इतका होता[५] तसेच त्याच्या केंद्रस्थानी एक उदयोन्मुख तारा होता.[९][१०]

टी टौरी तारे सूर्यापेक्षा तरुण आहेत. त्यांच्या भोवतीसुद्धा अशा तबकड्या आढळतात.या तबकड्यांचा व्यास काहीशे कि.मी. असून त्यांचे कमाल तापमान हे सुमारे १००० केल्व्हिन (सुमारे ७२७° सेल्सियस) इतके आहे.