Get it on Google Play
Download on the App Store

बुझणारा घोडा

एका घोड्याला आपल्याच सावलीत बुझण्याची सवय होती. ही सवय जावी म्हणून त्याच्या स्वाराने बराच प्रयत्‍न केला. शेवटी काटेरी लगाम घालून पाहिला, पण तरीही त्याची सवय जाईना. तेव्हा तो स्वार घोड्याला म्हणाला, 'मूर्खा, सावली म्हणजे तुझीच सावली. तुझ्या शरीरातून प्रकाश आरपार जात नाही म्हणून सावली पडते. सावलीला दात नाहीत; पंजे नाहीत अन् तुझ्यासारख्याच्या आडही ती येऊ शकत नाही, तर मग तू तिला भितोस का?' घोड्याने उत्तर दिले, 'अहो कोणी कितीही मोठा झाला तरी त्याला कशाना कशाची तरी भीती वाटतेच. तुम्ही माणसं स्वप्नात भीता किंवा अंधारात एखाद्या लाकड्याच्या ओंडक्याला पाहून घाबरता ते काय म्हणून ? तिथे तरी तुमच्या कल्पनेशिवाय तुम्हाला घाबरवणारं कोणी असतं काम ?'

तात्पर्य

- मी हसे लोकांना आणि शेंबूड माझ्या नाकाला.