Get it on Google Play
Download on the App Store

अभंग १७

हरिपाठ कीति गाणार्‍यात देह पवित्र होतो

हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्र तो होय देह त्याचा ॥१॥

तपाचे सामर्थ्या आमुप आहे.

तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप । चिरंजीव कल्प कोटी नांदे ॥२॥

सर्व गोत्र चतुर्भुज विष्णुरुप झाले

मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होवोनि ठेले ॥३॥

ज्ञानेश्‍वरमहाराजंना निवृत्तिनाथांनी ज्ञान गुढ गम्य दिले.

ज्ञानगुढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥४॥