Get it on Google Play
Download on the App Store

अभंग १४

नित्य सत्य, मित हरिपाठांत जो येतो, त्याकडे कळीकाळासही पहा त्याचे सामर्थ्य नाहीं.

नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥

रामकृष्णी वाचा हेंच महातप.

रामकृष्णो वाचा अनंतराशि तप । पापांचे कळप पळतीं पुढें ॥२॥

शिवाचा हरिमंत्र म्हटल्याने मोक्ष,

हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणता जे वाचा तयां मोक्ष ॥३॥

नारायणनामपाठानें निजस्थान प्राप्त होतें

ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाबिजे उत्तम निजस्थान ॥४॥