Get it on Google Play
Download on the App Store

अभंग ९

विष्णुविण जप हें व्यर्थ ज्ञान

विष्णुविण जप व्यर्थ ज्ञान । रामकृष्णी मन नाहीं ज्यांचें ॥१॥

अद्वय वाठ ज्या करंट्याला सांपडली नाहीं तो रामकृष्ण नामाचे ठिकाणी कसा विराजमान होईल ?

उपजोनि करंटानेणें अद्वयवाटा । रामकृष्णा पंठा कैसेनि होय ॥२॥

गुरुज्ञानावाचुन द्वैताची झाडणी केली म्हणतो त्याला नामसंकीर्तन कसे घडेल ?

द्वैताची झाडणी रारुविण ज्ञान । त्या कैचें कीर्तन घडेल नामीं ॥३॥

नामपाठाने प्रपंचाचें मौन होणें हेंच ज्ञानेश्वरमहारांजांचे सगुणध्य न होय.

ज्ञानदेव म्हणे सगुन हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥