Get it on Google Play
Download on the App Store

अभंग ७

महापातकी आजन्म अभक्तच रहातो

पर्वताप्रमाणें पातककरणें । वज्‍रलेप होणें अभवक्तासी ॥१॥

मक्तिहिन हरीला न भजणारे दैवहत अभक्त पतित होत.

नाहीं ज्यासी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत देवहत ॥२॥

वाचाळाला देवभेटी कोठुन ?

अनंतवाचाळ बरळती बरळ । त्य कैसेनि दयाळ पावे हरि ॥३॥

ज्ञानेश्‍वर महाराजांना सर्वाघटीं पुर्णत्वानें नांदणारा एक आत्माच प्रमाण आहे.

ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वाघटीं पुर्ण एकनांदे ॥४॥