Get it on Google Play
Download on the App Store

नरहरी राहे एकचित्तें

काय तुझी थोरी वर्णूं मी पामर । होसी दयाकर कृपानिधी ॥ १ ॥

तुजसरशी दया नाहीं आणिकासी । असे ह्रषीकेशी नवल एक ॥ २ ॥

जन हो जोडी करा नाम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवासी ॥ ३ ॥

नरदेही साधन समता भावभक्ति । निजध्यास चित्तीं संतसेवा ॥ ४ ॥

गुरुपदीं निश्चळ परब्रह्म पाहे । नरहरी राहे एकचित्तें ॥ ५ ॥