Get it on Google Play
Download on the App Store

म्हणे नरहरी सोनार

नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥

आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥

म्हणे नरहरी सोनार तैं क्षर ना अक्षर । परेहुनी परात्पर ब्रह्म जैसें ॥ ३ ॥