Get it on Google Play
Download on the App Store

चरणावरी माथा नरहरी ठेविला

नाम हे नगरी वैकुंठ पंढरी । नांदता श्रीहरी पांडुरंग ॥ १ ॥

नरदेहीं जन्मले पंढरीस गेले । दृष्टीभरि पाहिले पांडुरंग ॥ २ ॥

भीवरेचें स्नान देवाचें दर्शन । पाप हे जळोन जाय तेथें ॥ ३ ॥

चरणावरी माथा नरहरी ठेविला । ह्रदयीं बिंबला पांडुरंग ॥ ४ ॥