Get it on Google Play
Download on the App Store

सुमात्रा

प्राचीन काळात सुमात्राला सुवर्णद्वीप किंवा सुवर्णभूमी या संस्कृत नावांनी ओळखले जायचे. हे नाव कदाचित तेथील सापडणाऱ्या सोन्यामुळे असावे.

अरब नकाशेकारांनी इसवी सनाच्या १० ते तेराव्या शतकात याचे नाव लामरी (लामुरी, लांब्री किंवा रामनी) असल्याचे नमूद केले होते. 

सुमात्रा हे नाव इसवी सनाच्या १४व्या शतकात रूढ झाले. हे नाव समुद्र वंशाच्या राजांमुळे पडले. 

इसवी सनाच्या १९व्या शतकात युरोपीय लेखकांच्या मते सुमात्रात राहणार्‍या लोकांना आपल्याच बेटाचे नाव माहिती नव्हते

इ.स.पू. ५००च्या सुमारास ऑस्ट्रोनेशियन भाषा बोलणारी लोक सुमात्रात आली. 

भारत-चीन सागरी मार्गावर असल्यामुळे येथे त्यानंतर अनेक गावे वसलेली. विशेषतः पूर्व किनाऱ्यावरील या वसाहतींवर भारतातील धर्मांचा प्रभाव होता.तव्या शतकात या भागातील लोकांवर हिंदू संस्कृतीचा मोठा प्रभाव होता.

तद्नंतर मुस्लिमांनी येथे वर्चस्व प्रस्थापित केले. 

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज व तद्नंतर डचांचे आगमन झाले. 

मलॅका सामुद्रधुनीचे व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी सतराव्या शतकात येथे व्यापारी वखारी स्थापन केल्या तथापि सुमात्रावर डचांचे आधिपत्य होते. 

इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यानंतर इंडोनेशियन प्रजासत्ताकांत सुमात्रा सामील झाले.