Get it on Google Play
Download on the App Store

इंडोनेशिया

जीवाश्म अवशेषांवरून काढलेल्या निष्कर्षानुसार येथे पाच लाख वर्षांपूर्वीचा आदिमानव सापडतो. याला जावा पुरुष म्हणून ओळखले जाते. 

सुमारे २००० वर्षापूर्वी येथे पूर्वेकडील देशांमधून म्हणजे तैवानमधून लोक आले व त्यांनी हा भागा ताब्यात घेतला, असे मानणारा एक प्रवाह आहे.. त्यानंतर त्यांनी भातशेती व इतर कलाकौशल्ये मिळवली. भारत व चीन या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापाराने या देशाची संस्कृतीला आकार दिला. 

सातव्या शतकात श्रीविजय या नाविक प्रबळ असलेल्या राजाने हिंदू तसेच बौद्ध धर्म यांना स्थान दिले. त्यानंतर शैलेंद्र व मातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूर व प्रंबनन ही धार्मिक शहरे वसवली. 

मजापहित हे हिंदू राजघराणे तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. 

मात्र त्या नंतर मुसलमान व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने येथे आले हळूहळू जम बसवत त्यांनी सुमात्रा बेटावर ठाणे वसवले. येथून इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरुवात झाली. सोळाव्या शतकापर्यंत बहुतेक भाग मुसलमान झाले होते.

१५२१ मध्ये येथे पहिल्यांदा युरोप खंडातून पोर्तुगीज लोक आले. त्यांना येथील मसाल्याचे पदार्थ हवे होते. त्यानंतर ब्रिटिश व डच आले. डच लोकांनी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून येथे अंमल बसवला. १८०० मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषित केले.

  • इंडोनेशियातील लष्कराची आणि पोलीस दलाची घोषवाक्ये वाचली कि लक्षात येईल कि हा प्रदेश देखील आपल्याच संस्कृतीचा भाग होता 

    • कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन -इंडोनेशियन वायुदल स्पेशल फोर्स कोअर
    • जलेषु भूम्याम्‌ च जयामहे -इंडोनेशियन मरीन कोअर
    • जलेष्वेव जयामहे -इंडोनेशियन नौदल
    • त्रिसंन्ध्या-युद्ध -इंडोनेशियन पायदळ
    • द्वि-शक्ति-भक्ति -इंडोनेशियन इक्विपमेन्ट कोअर
    • धर्म-विचक्षण-क्षत्रिय -इंडोनेशियन पोलीस प्रबोधिनी (इथे धर्म म्हणजे रिलिजन नाही, तर कर्तव्य हा मूळ अर्थ)
    • राष्ट्रसेवकोत्तम -इंडोनेशियन राष्ट्रीय पोलीस दल
    • सत्य-वीर्य-विचक्षणा -इंडोनेशियन सैनिकी पोलीस