Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

वृद्धाक्षत्र


जयद्रथाने अभिमन्यूला कुरुक्षेत्रात मारले होते. अर्जुनाने शपथ घेतली होती की पुढच्या दिवशी सुर्यास्तापुर्णी ततो जयद्रथाचा वध कारेल. जयद्रथाचे वडील वृद्धाक्षत्र यांना ही गोष्ट त्याच्या जन्मापासून माहिती होती. त्यावेळी दुःखाच्या भारत त्यांनी शाप दिला होता की ज्याच्या हातून माझ्या मुलाचे मस्तक धरतीवर पडेल त्याचे मस्तक देखील त्याच क्षणी तुटून विखरून जाईल. अर्जुनाने पुढच्या दिवशी जयद्रथाचे मस्तक छाटले. कृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की जयद्रथाचे मुंडके अशा प्रकारे उडव की त्याचे मस्तक वृद्धाक्षत्र च्या मांडीवर पडले पाहिजे. वृद्धाक्षत्र त्या वेळी तपश्चर्या करत असल्यामुळे हे पाहू शकले नाहीत. जेव्हा ते तप करून उठले तेव्हा जयद्रथाचे मस्तक त्यांच्या मांडीवरून धरतीवर पडले आणि त्यांच्याच शापाच्या प्रभावाने त्यांचे मस्तक तुटून विखरुन गेले.