Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

काल भैरव


काल भैरव हे भगवान शंकराचे एक भयानक असे रूप आहे. भारत देशात कालभैरवला खूप लोक मानतात. दिसायला खुपच भयंकर अशा काल भैरवाच्या हातात त्रिशूळ, डमरू आणि ब्रम्हदेवाचे पाचवे मस्तक असते. त्याला मृत्यूला पराभूत करणारा मानले जाते. त्याचा तिसरा डोळा हे अखंड ज्ञानाचे प्रतिक आहे. भिरावावर भगवान शंकराच्या आदेशाने ब्रम्हदेवाचे पाचवे मस्तक छाटल्याचा आरोप आहे. मात्र ब्रम्हदेवाचे मस्तक कापणे याचाच दुसरा अर्थ असा की ब्रम्ह हत्येचे पातक लागणे. म्हणूनच भैरवाला ते मस्तक १२ वर्षे ठेवावे लागले. जोपर्यंत गुन्ह्याचा प्रभाव होता तोपर्यंत तो इकडे तिकडे भटकत राहिला. बहुतेक वेळा भैरवाची मूर्ती आपल्याला याच रुपात पाहायला मिळते.
भैरवाचे पूजन केल्यामुळे यश मिळवणे, सुख मिळवणे आणि शत्रुणा पराभूत करणे आपल्याला सुलभ जाते. तो भक्तांना वेळेचा सदुपयोग करायला शिकवतो. म्हणूनच त्याला काळाचा देवता असे देखील म्हटले जाते. तो आपल्या भक्तांची सर्व कार्ये संपन्न करतो. त्याला मंदिराचा कोतवाल असे देखील म्हटले जाते. शंकर आणि शक्तीच्या मंदिराच्या चाव्या मंदिर बंद करताना भैरवाच्या हवाली केल्या जातात आणि सकाळी त्याच्याकडूनच परत घेतल्या जातात. तो प्रवासी आणि तीर्थयात्रेला जाणार्या लोकांचे विशेष रक्षण करतो.