Get it on Google Play
Download on the App Store

मुलींचे होस्टेल

Writer- Nikita Deshpande

मी होस्टेल वर राहत
असतांना चा हा प्रसंग......प्रसंग
सांगण्या आधी थोड सविस्तर सांगणे गरजेचे
आहे...त्यानुसार
....एका इमारतीच्या चारही बाजूने
मुलींना राहण्यासाठी खोल्या होत्या आणि मधल्या भागात
काकी (owner) राहत असत ..प्रत्येक ब्लोक
मध्ये एक छोटे
किचन आणि एक खोली या पद्धतीने बनवलेले
आणि प्रत्येक
खोलीत
दोघींच्या राहण्याची सोय....आमच्या बाजूने ६
खोल्या होत्यात.....पण आम्ही सर्व एवढे
मिळून राहत असू
कि कोणती खोली नेमकी कोणाची हे लक्षात राहत
नसे
आणि तसे लक्षात
ठेवण्याची गरजही कधी भासली नव्हती....
काकींच्या घरी त्यांची तीन मुले, काका आणि एक
आजारी आजी (काकांची आई) राहाय्चे....आजी
गेल्या ६
वर्षांपासून आजारी होती आणि पलंगावरच
होती..आजीचा तिच्या परिवाराकडून फार छळ
होत असे,
तिला नीट खायला प्यायला देखील दिले जात
नव्हते.
तिच्याशी कोणी एका शब्दानेही नीट बोलत
नसत....एक तर
आजाराने आणि आपल्याच
लोकांच्या अशा वागण्याने आजी खूप
दुखी असायची....तिचे हे हाल आमच्याने बघवत
नसे,
आजी आणि आमच्यात मात्र जिव्हाळ्याच नातं
होतं......आजीशी चर्चा करायला आम्हाला खूप
आवडायचे..आजी सुशिक्षित होती, तिच्याजवळ
भरपूर
knowledge होते...आणि होस्टेल च्या सर्वच
मुलींशी चर्चा,
गप्पा करत असल्याने तिचे knowledge up
to date
hote...कोणाला परीक्षेच्या शुभेच्छा देऊ दे,
तर
कोणाला किती मार्क्स मिळाले..पुढे काय करावे
हे मार्गदर्शन
आजीकडून सतत मुलींना मिळत
राहायचे...आम्ही आपल्या डब्यातलं जेवण,
गावावरून
आणलेला खाऊ आजीला आवर्जून देत असू
आणि आजीही ते
आवडीने खात असे..
एकदा आठवड्याभरयाच्या सुट्टीनंतर मी घरून
होस्टेल वर परतले
तेव्हा आजी गेल्याची दुखद बातमी मिळाली...मन
चरचरले
शेवटची भेट झाली नाही म्हणून खूप वाईट
वाटले...पण 'जाचातून
सुटली एकदाची' असे बोलून
आम्ही आमच्या रोजच्या कामाला लागलोत..तीन
दिवस गेले
असावेत बहुदा... अचानक थंडी भरून ताप
आल्याने
मी संध्याकाळी जरा लवकरच office मधून
सुट्टी घेऊन
घरी आले....आजीचा बारावा व्हायचाच
होता म्हणून काकींकडे
बरीच पाहुणे मंडळी होती...मी डॉक्टर कडे जाऊन
आले...काहीतरी खाऊन, औषध घेऊन
मी झोपी गेले तेव्हाच सर्व
मुली जागेवरून उठल्या. मला disturbance
नको म्हणून
दुसऱ्या खोलीत अभ्यासाला जाऊन बसल्यात.
बराच वेळ
गेला असेल बहुदा... माझा बेड जोरात हलतोय
असे वाटून
मी दचकून उठले..बेड अजूनही हलत होता,
माझा भास असेल असे
समजून मी उठून बसले बेड आणखी जोरात
हलायला लागला...हाताच्या लाम्बीवरच स्वीच
होते मी लाईट
लावलेत अगदी समोर असलेल्या घड्याळात
बघितले बरोबर
बारावर काटा होता. मी अतिशय घाबरले.
कोणाला आवाज
दयायला म्हणून दाराकडे जाणार तर
मला आजीची सावली दिसली म्हणजे स्पश्ट
नाहि पण
ती आजीच आहे हे कळ्त
होते.....मी अक्षरशः कोसळणार
तेवढ्यात तोंडातून किंकाळी फुटली आणि सर्व
धाऊन
आल्यात.....मला काहीतरी दिसले,
मला काहीतरी दिसले
मी एवढंच बडबडत होते...मैत्रिणीनी मला शांत
केले
आणि थोडावेळात मी झोपी गेले....दुसऱ्या
दिवशी तापामुळे
झालेला हा भास असावा अशी ठाम समजूत
मी स्वताची करवून
एकदम नॉर्मल झाले होते..... पण....
त्या रात्री परत
एकदा मला आला तसाच्या तसा तंतोतंत
अनुभव
आणखी दुसऱ्या मुलीला आला....वाचता वाचता पुस्तक
पोटावरच ठेवून झोपी गेलेली ती अचानक बेड
हलल्याने
जागी झाली बेड वर उठून बसली तर समोर
आजी दिसून गायब
झाली....ती इतकी घाबरली कि कितीतरी वेळ
तिच्या तोंडून
आवाज निघेना...तिच्या किंचाळीने आम्ही तिथे
पोहोचलो....
आणि हकीकत ऐकून माझी नजर मात्र प्रथम
घड्याळीकडे
वळली आणि त्यावेळी घड्याळात रात्रीचे १२.०३
झाले
होते...... तिची स्थिती मीच समजू शकत होते
कारण मी देखील
तो अनुभव घेतला होता....इतर
मुलींच्या घोळक्यात
दोन्ही विचारांच्या मुली होत्या आणि हा निव्वळ
भास आहे असे
घोषित करून वातावरण नॉर्मल
करण्याचा प्रयत्न
सर्वांनी केला कारण पुढेही तिथेच राहायचे होते...
तिसऱ्या दिवशी कोणी कोलेज तर
कोणी नौकरीच्या निमित्त्याने
बाहेर पडलेत होस्टेल वर त्यादिवशी फक्त एकंच
'रीना'
नावाची मुलगी शिल्लक होती...आज
तिला कुठेही जायचे नव्हते
आणि बिंदास न घाबरणारी म्हणुन
ओळखल्या जाणार्या हिला सोडून आम्ही सर्व
आमच्या कामाने
निघून गेलोत....दुपारी तीन वाजता अभ्यास करत
बसलेल्या रीनाला कोणीतरि बाजुला उभे अस्ल्याचे
जानवले, बेड
हलण्याचा भास झाला तिने झटक्याने दाराकडे
वळून पहिले
आणि अक्षरशः आजी तिला तिच्या शेजारी दारात
दिसली आणि नाहीशी झाली....त्या क्षणाला सर्व
पुस्तके टेबल
खुर्ची फेकून ती थेट बाहेर येऊन
बसली आणि जोपर्यंत
आम्ही सर्व आलो नाहीत ती तब्बल ४-५ तास
मैनगेट वर रडत
घाबरत बसून होती.....त्या दिवसा नंतर मात्र
एक एक करून
सर्वांनी होस्टेल
सोडले.....आजीच्
या बारव्याला आम्ही कोणीही तिथे
नव्हतो...आजही विचार करतांना वाटतं काय होतं
हे..तीन
वर्षात कधीच असा अनुभव आला नवता...मग
आता का??
आजीला काही सांगायचे होते का??
कि ती शेवटची भेट
घ्यायला म्हणून आली होती?? कि हे सर्व फक्त
मनाचे खेळ
होतेत....भास होते तर तब्बल तिघींना सारखेच
भास कसे??
सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरीत...
कोणालाही विश्वास बसणार
नाही असा हा अनुभव आहे.... पण
१००% खरा आहे.......एक
शब्दही कल्पनेतला नाही.......याच
दिवसांपासून मी कमीत कमी अशी काही शक्ती,
प्रकार
नसतातच असा जिद्दीने वाद घालणे सोडून
दिला आहे......