Get it on Google Play
Download on the App Store

पिंपळ रेकॉर्डिंग चेक

रेकॉर्डिंग चेक... रेकॉर्डिंग चेक... रेकॉर्डिंग चेक...

दिवस पहिला रेकॉर्डिंग...

मी आजच पिंपळला पोहचलो आहे आणि इथेच एका धर्मशाळेत थांबलो आहे. सध्या मी त्या पिंपळाच्या झाडाखाली आहे ज्याच्यामुळे ह्या गावाचं एवढं नाव झालं आहे आणि ह्या पिंपळाच्या झाडामुळेच ह्या गावाचं नाव पिंपळ पडलं होतं.

हे गांव जैसलमेर पासून जवळ जवळ १५० कि.मी. अंतरावर आहे आणि ह्या गावाला बघूनच असं वाटतं कि अजूनपर्यंत सरकार इथपर्यंत आलेले नाही आहे. जवळ जवळ २०० घर असलेल्या ह्या गावात काही चांगल्या सोयीच नाही आहेत. जसं टीवी, कॉम्पुटर, मोबाईल तर लांबची गोष्ट आहे, इथे वीज पण दिवसा फक्त ३ तासच असते. हे एका इंडिअन फिल्म मध्ये दाखवल्या जाणाऱ्या एका गावांपैकी एक आहे. चार हि बाजूला वाळूच वाळूच आणि डोक्यावर मडक उचलून जवळच्या विहिरीतून पाणी भरणाऱ्या बायका.

गावापासून जवळ जवळ ३ कि.मी. लांब वाळवंटाच्या मध्येच हे पिंपळाच झाड आहे आणि खरं तर, ह्या झाडाशिवाय लांब लांब पर्यंत हिरवळीच नामोनिशाण पण नाही आहे, फक्त राजस्थानच वाळवंट.

जशी झाड असतात तसंच हे एक सामान्य झाड आहे, जसं कि प्रत्येक पिंपळाच झाड असतं . ह्या झाडाची सगळ्यात अनोखी गोष्ट म्हणजे त्याची साईज. त्याचं खोड बघूनच डायामीटर मध्ये कमीत कमी ५ मीटरच आहे, पण एका पिंपळाच्या झाडाचा खोड डायामीटर मध्ये ३ मीटर पर्यंतच असतं.

दुसरी गोष्ट अशी कि ज्या प्रकारे हे झाड वाळवंटाच्या मधोमध उगवलं आहे, ती एक स्वतः एक मिस्ट्री आहे. इथे लांब लांब पर्यंत पाण्याचे नामोनिशाण हि नाही आहे, पाऊसपण कमी पडतो इथे तरीपण झाड पूर्णपणे हिरवेगार असतं .

झाडाच्या खोडाला लाल रंगाचे दोरे बांधले आहेत, खाली हनुमान ची एक मूर्ती स्थापित आहे. आजू बाजूच्या जागेला बघूनच ह्याच्या धार्मिक महत्वाचा अंदाजा लाऊ शकतो.

झाडापासून थोड्या अंतरावर शंकराचं एक जुनं मंदिर आहे, which dates back to Mughal era. हे मंदिर जुन असल्या कारणाने एक ऐतिहासिक स्मारक मानलं जात आहे, पण हैराणीची गोष्ट अशी कि हे मंदिर एवढं मोठ असून हि ह्या मंदिराच्या निर्माणाची गोष्ट इतिहासात नमूद करून नाही ठेवली आहे. काही लोकं मानतात कि हे स्वतः बादशाह अकबर ने बनवलं होतं आणि काही काही म्हणतात कि त्यावेळच्या राजपूत शाशकाने.

हि जागा गावापासून जवळ जवळ ३ कि.मी. बाहेर आहे आणि माझ्या बरोबर ह्यावेळी गावात राहणारे हेमंत काका आहेत.

काका तुम्ही आम्हाला ह्या मंदिरा आणि झाडाबद्दल काय काय सांगू शकता?

काका : हे तुमच्या हातात काय आहे साहेब?

हे एक छोटसं टेप रेकॉर्डर आहे काका. मी आणि तुम्ही जे काही बोलणार ते सगळं ह्याच्यात रेकॉर्ड होणार.

काका : तुम्ही ह्याला रेडीओ वर वाजवणार? सगळे माझा आवाज ऐकून मस्करी करतील.

अरे नाही, मी ह्याला आपल्या संगती घेवून जाणार आणि नंतर सगळी गोष्ट एका कागदावर आरामात लिहिणार.

काका : वर्तमानपत्रात छापणार?

हां असंच काही समझून घ्या, मी तुमच्या गावाबद्दल आणि ह्या झाडा विषयी एक कथा लिहित आहे. तुमच्या आणि माझ्या मधील संव्वाद मी परत जाऊन आरामात ऐकणार आणि मग आरामात लिहिणार.

काका : मस्तच वस्तू आहे.

ती तर आहेच. हां तर तुम्ही मला गावाबद्दल काय काय सांगू शकता? तुम्ही इथे पहिल्यापासून राहात आलात

कि...?

काका : हां माझा जन्म इथेच झाला आहे आणि मी माझे सगळे जीवन इथेच व्यतीत केलं आहे. ह्या गावचं नाव पिंपळ कसं पडलं? काका : आत्ता हि तरी माझ्या जन्मा आधीची गोष्ट आहे, एवढं मला माहीत आहे कि, पहिले गावचं नाव काही वेगळेच होतं, पण नंतर सगळे ह्या पिंपळाच्या झाडाविषयी बोलू लागले आणि हळू हळू सगळ्यांनी गावाला पिंपळ गांव बनवून टाकलं. पहिले गावचं नाव काय होतं? काका : हे तर मला पण नाही माहीत. खूप जुनी गोष्ट आहे. असो, ह्या पिंपळाच्या झाडा विषयी तुम्ही काय सांगू शकता.? काका : पवित्र आहे हे झाड, बिलकुल त्यांच्या प्रेमासारखं पवित्र. कोणाच्या प्रेमासारखं.? काका : राजश्री आणि अजमल, राजश्री राठोर आणि शेख अजमल अहमद खान. कोण होते ते दोघं? राजश्री तर इथलीच राहणारी होती आणि अजमल आग्रा मधून होता, आणि बोलतात कि.. एक मिनट काका, वाटतंय रेकॉर्डिंग थांबली आहे. नाही चालत आहे. सोर्री, काय बोलत होता तुम्ही. राजश्री इथल्याच एका राजवाड्याची मुलगी होती आणि अजमल बादशाह अकबरच्या फौजेमधला एक शिपाई होता. इंटरेस्टिंग, तर त्यांच ह्या झाडाशी काय संबंध आहे.? जिथे हे झाड आहे ना, इथेच मेले होते ते दोघे. मेले होते? म्हणजे? मारून टाकलं होतं त्या दोघांना इथेच. कोणी मारलं होतं? राजपुत्रांनी का? पूर्ण गोष्ट सांगाल आम्हाला? आता मुघल आणि राजपुत्रांच्या मधले युद्ध कोणाला नाही माहित, त्या जमान्यात हि सगळी जागा राजपुत्रांच्या नावाने ओळखली जात होती आणि मुघलांची पण इच्छा होती कि हि जागा त्यांच्या जागांमध्ये शामिल होवो आणि हिकडचे राजा मुघालांसमोर आपली मान खाली झुकवणार म्हणजे हे राजपुत्रांच्या आणबाणच्या विरुद्ध होतं. {हसायचा आवाज} हां वाचलं होतं शाळेच्या पुस्तकांमध्ये. मग..? {काकांच्या हसण्याचा आवाज} आता ह्या सगळ्या रागांच्या मध्ये कसं काय प्रेम झालं कुणास ठाऊक आणि ते पण दोन दुष्मनांमध्ये. जेव्हा बादशाह अकबर ने राजपुत्रांकडे मित्रत्वाचा हाथ पुढे केला तेव्हा काही जणांनी स्वीकार केला आणि काहींनी नकार दिला आणि इथे ज्या राजपुत्र राजाच वास्तव्य होतं त्यांनी पण मित्रत्वाचा हाथ स्वीकारला होता. ह्म्म्म, इंटरेस्टिंग पुढे.? जेव्हा हाथ मिळाले तेव्हा इथे मुघालंचे येणे जाणे सुरु झाले. असंच एकदा इथे आला शेख अजमल अहमद खान. तो अकबर च्या सेनेतला शिपाई होता आणि मग देव जाणो कसं, त्याचं राजश्री राठोरशी प्रेम झालं. राजश्री कोण होती? राजकुमारी होती ती इथली. बोलतात कि भरपूर सुंदर होती. एवढी सुंदर कि त्यीच्याविषयी बोलण म्हणजे सूर्यला प्रकाश दाखवण्या सारखं होईल. पूर्ण राजपुत्रांमध्ये तिच्या रंग रूपाचीच चर्चा असायची आणि प्रत्येक राज्यातला राजकुमार तिच्याशी विवाह करण्यासाठी उत्सुक होता. मग अजमलच प्रेम एकतर्फी होतं.? नाही, हीच तर कमालीची गोष्ट आहे. प्रेम दोघेही एकमेकांवर सारखेच करायचे, जसे जश्याप्रकारे तो राजश्रीला प्रेम करायचा त्याचप्रकारे तीपण त्याच्यावरती फिदा होती. एका शिपाई वर? हां, एक राजकुमारी जिच्या वाटेत चांगले चांगले राजकुमार स्वतःच ह्रिदय पकडून उभे होते, ती एक मुघल सेनेतल्या शिपायावर प्रेम करून बसली. नंतर काय झालं? हे शंकराचं मंदिर जे तू बघत आहेस ना, हे तर फक्त आता एक जुनं मंदिर झालं आहे, पण त्या वेळी त्या वेळी हे एक आलिशान असं मंदिर असायचं. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री इथे शंकराची भव्य पूजा होतं होती, सगळे राजे राजवाडे इथे यायचे. ह्म्म्म , नंतर? लोकं सांगतात त्या प्रेमी जोड्याने पण हीच जागा आणि ह्याच रात्री मिलनाचा दिवस बनवला होता. राजश्री एक राजकुमारी होती आणि अजमल एक शिपाई. सगळ्यांसमोर तर एकमेकांना भेटणे म्हणजे संभव नव्हते म्हणून ते दोघे लपून-छपून इथे भेटायचे. प्रत्येम पौर्णिमेच्या रात्री राजश्री त्यीच्या घरच्यांबरोबर इथे यायची आणि अजमल एका हिंदूचा वेश बदलून आग्रावरून इथे यायचा. वाव... आग्र्यावरून इथे ते पण त्या दिवसात.? पुष्कळ दिवस लागत असतील ना त्याला. प्रेमात आंधळा होता साहेब. आपल्या प्रेमिकासाठी तो प्रत्येक पौर्णिमेला आपला वेश बदलून इथे यायचा. वेश बदलून का? कारण तो एक मुघल होता, मुसलमान. जर तो असाच आला असता तर पहिले इथल्या लोकांना शंका आली असती कि एक मुसलमान प्रत्येक पूजेला हाजीर का असतो? आणि दुसरा मुघलांना शंका आली असती कि आपला एक शिपाई का इथे एवढ्या लांब येवून हिंदूंबरोबर पूजा मध्ये सहभाग घ्यायचा. खरी गोष्ट आहे, नंतर? नंतर कोणालाच माहित नाही कि हे किती वर्ष चाललं, पण बोलतात ना "प्यार छुपाये नही छुपता है" त्या दोघांच कांड समझलं. कसं? असं बोलतात ना "इश्क़ और मुश्क छुपाये नही छुपते" आणि ती तर मग एक राजकुमारी होती, कधी ना कधी तरी गोष्ट कळलीच असती. सांगतात कि ती पूजेच्यानंतर २-३ दिवस मंदिर मध्येच थांबायची, ह्या कारणाने कि ती दाखवायची कि मी शंकराची किती मोठी भक्त आहे, पण खरं तर हे होतं कि ती इथे थांबून अजमल बरोबर आपला वेळ घालवायची. नंतर? नंतर एक दिवस त्यांना कोणी तरी सोबत असताना बघितलं आणि हि गोष्ट पोहोचली राजश्रीच्या वडिलांपर्यंत. ज्याणे त्यांना बघितलं त्याने लगेच अजमलला ओळखले कि तो मुघल आहे. हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा बादशाह अकबर ने महाराणी जोधाबाई बरोबर लग्न केलं होतं. ह्या गोष्टीमुळे त्या वेळेस राजपुत्रांमध्ये खूप आक्रोश होता. जेव्हा हि गोष्ट राजश्रीच्या वडिलांना समझली, आगोदरच रागात असणारा राजा हे ऐकून पागल झाला. {माचीस जळण्याचा आवाज} एक सिगारेट मला पण पाहिजे साहेब. हां घ्या. {परत माचीस जळण्याचा आवाज} नंतर काय झाले...? एका पौर्णिमेच्या पूजेच्या २ दिवस नंतरची गोष्ट आहे, राजश्री परत काही तरी बहाणा करून पूजेच्या नंतर मंदिरात थांबली होती आणि अजमल पण इथेच होता. त्या दोघांना एकसाथ बघितले गले होते आणि हि गोष्ट राजश्रीच्या वडिलांपर्यंत पोहोचली होती. रागात पागल राजा लगेच आपल्या काही माणसांबरोबर मंदिर मध्ये पोहोचला. त्याने मारून टाकले दोघांना? हां, बोलतात कि तो रात्रीच्या वेळी इथे पोहोचला आणि जेव्हा तो आला तेव्हा ते दोघे प्रेमी इथे वाळवंटाच्या एका टोकावर्ती कामक्रीडा करण्यात मग्न होते. राजा आला होता अजमलला मारायला पण आपल्या मुलगीला, असं नग्न अवस्थेत एका मामुली शिपाईच्या बाहुपाशात बघून तो स्वतःवरचा आपा हरवून बसला आणि त्याच वेळी त्याने अजमलच्या बरोबर आपल्या मुलीला पण मारून टाकलं. भयंकर... नंतर..? बस एवढीच गोष्ट होती साहेब, त्याच्यानंतर काय झाले कुणास ठाऊक. वेळेप्रमाणे सगळं बदलायला लागलं, ते मुघल साम्राज्य ते राजवाडे सगळं संपलं, बस राहिलंय ते हे पिंपळाच झाड. पिंपळाच्या झाडाची गोष्ट अजून पर्यंत मला समजली नाही, ह्या पूर्ण गोष्टीत त्या झाडाचं काय संबंध? जिथे ह्या झाडाची मुळ आहे ना साहेब, तिथेच त्या दोन प्रेमींच रक्त पडलं होतं. त्यांच्या मरणाच्या काही दिवसानंतर कसं इथे ह्या वाळूत पिंपळाच झाड उगवलं माहित नाही. आत्ता हि खरोखरच एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर तुम्हाला वाटतं कि हे पिंपळाच झाड अकबरच्या वेळेपासून इथे आहे.? नाही हे वालं झाड तर माझ्यासमोरच मोठं झालं आहे. जेव्हा जून झाड मारायला येतं तेव्हा ठीक त्याच्या बाजूला एक नवीन झाड उगवत आणि जुन्या झाडाची जागा घेतं. मग इथे पहिले एक दुसरं झाड होतं? हां, जेव्हा मी छोटा होतो तेव्हा. माझ्यासमोरच ते झाड मेले आणि आपल्या आप हळू हळू तुटून गेलं. असा तुटला जसा काही मातीचाच बनला आहे आणि हळू हळू असे वाटले माती पडते आहे. आणि जसे जसे ते झाड संपलं, त्याच्या जागी हे नवीन झाड उगवलं. पिंपळाच का? कोणतं दुसरं झाड का नाही.? निसर्गाची देण आहे साहेब. आणि दुसरं झाड पण का, पिंपळाच का नाही.? जर वडाच झाड असत तर तुम्हीच बोलला असता आंब्याच का नाही? चिकूच झाड असत तर बोलला असता सफरचंदाच का नाही.? हि तर निसर्गाची देण आहे साहेब. तर गावाच्या लोकांच ह्या झाडाबद्दल काय मत आहे? लोकांच म्हणणं आहे कि ज्या प्रकारे हे झाड वाळवंटाच्या मध्ये आपली हिरवळ घेवून उभा आहे, त्याचप्रकारे हा लोकांच्या मांगण्या पूर्ण करतो. त्यांच त्रास दूर करून त्यांच्या दुखी जीवनात परत हिरवळ प्रदान करतो. तुम्ही विश्वास ठेवता ह्या सगळ्या गोष्टींवर? बिलकुल करतो. तर ह्याचा अर्थ असा कि राजश्री आणि अजमल मेल्या नंतर पण लोकांच्या मांगण्या पूर्ण करतात? स्वतः निघून गेले आणि त्यांच्या पाठी एक पिंपळाच झाड सोडून गेले.? निघून गेले? {हसण्याचा आवाज} नाही साहेब, ते दोघे तर आज पण इथेच आहेत. {टेप रेकॉर्डर पडण्याचा आवाज} इथेच आहेत म्हणजे.? प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री ते दोघे इथे परत येतात. प्रेमलिला करतात, जिथे दोघे जिवंत असताना एक नाही होवू शकले, पण मेल्यावर ते दोघे एक होतात. वाव {हसण्याचा आवाज} आणि तुम्ही विश्वास ठेवता ह्याच्यावर? बिलकुल. तुम्ही बघितलं त्या दोघांना? नाही. दुसऱ्या कोणी बघितलं? ज्याने बघितलं तो जिवंत वाचला नाही. म्हणजे ते दोघं आता भूत बनून लोकांना मारत आहेत.? तुम्हाला तुमच्या बायको बरोबर काम क्रीडा करताना कोणी बघितलं तर तुम्ही काय करणार? त्यांना त्या अवस्थेत कोणी पाहिले म्हणून त्यांनी त्या लोकांना मारून टाकलं होतं. दुसरा दिवस रेकॉर्डिंग. आत्ता पर्यंत मी जे काही ऐकलंय आणि बघितलं, त्याने हे झाड हंटेड भूत पिशाच असल्याच माहिती पडतं. किती खरं आहे हे कोणालाच माहिती नाही आणि ज्यांच्याबरोबर पण मी वार्ता केली आहे त्या लोकांनी भूतांना बघितलं नाही आहे, पण प्रत्येकजण २ गोष्टी मानतात. एक तर हि कि जर कोणी आपल्या एकदम मनापासून जर जे काही मांगून ह्या झाडाला धागा बांधला तर त्याची ती मांगणी पूर्ण होते. आणि दुसरी हि कि प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री राजश्री आणि अजमल RETURN FROM THE DEATH AND THEY ACTUALLY HAVE SEX UNDER THE TREE. THIS MIGHT SOUND RIDICULOUS AND FUNNY, पण इथे राहणारा प्रत्येक व्यक्ती हि गोष्ट आपल्या मनापासून मानतो. हे लोकं हि गोष्ट ह्याप्रकारे मानतात कि प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री काळोख होता होता गावातला प्रत्येक माणूस आपआपल्या घरात निघून जातो आणि खिडकी दरवाजे सगळे बंद करून घेतो. कारण एकच आहे कि त्यांना २ भूतांच सेक्स नाही पहायचं आहे, कारण त्यांनी पाहिले तर भूत त्यांना जिवंत नाही सोडणार. I dont know what to believe or not, पण ह्यांच्या गोष्टींवर किती दम आहे हे पाहण्यासाठी आजची रात्र मी त्या झाडा खाली व्यतीत करणार आहे. आज पौर्णिमेची रात्र आहे आणि लोकांची गोष्ट खरी आहे तर मी आज भूत आणि माझं नशीब चांगल असेल तर मी आज भूतांना सेक्स करते वेळी पाहणार आहे. {हसण्याचा आवाज} आणि जर असं झालं तर मी ह्या जगातला पहिला माणूस असणार, जो "घोष्ट पोर्न बघणारा" असणार आहे. {हसण्याचा आवाज} मी बस आत्ता घरातून निघतच आहे. काळोख झाला आहे आणि गावातले सगळे लोकं आपआपल्या घरात शिरले आहेत. मी धर्मशाळेतल्या अधिकाऱ्याला न सांगता लपून निघणार आहे, कारण मला असं नाही करायचं आहे कि गावातली लोकं माझ्यापासून नाराज होवो. कसे पण असो, माझं तिकडे जाणं म्हणजे त्यांच्या गोष्टींची मस्करी केल्यासारखी होईल. {रेकॉर्डिंग स्टोप्स} रात्रीचे १० वाजले आहेत. मी ह्यावेळी झाडाखाली बसलो आहे आणि चारही बाजूला चंद्राचं चांदण पसरलं आहे. खूप सुंदर देखावा आहे. चांदण्यांत चमकणारे वाळूचे कण, थंड हवा, मध्येच उभा एक एकटा झाड आणि त्याच्या बरोबर एक जुनं मंदिर. {रेकॉर्डिंग स्टोप्स} रात्रीचे १२ वाजले आहेत. दिवसा जेवढी गर्मी होती तेवढीच रात्री थंडी आहे आणि आय विश मी माझी ज्याकेट सोबत आणली आहे. आत्ता पर्यंत असं काहीच निदर्शणात नाही आले आहे जेणेकरून मी आपल्या भूत बघण्याचं स्वप्न पूर्ण झाल्या सारखं समझू शकेन. {रेकॉर्डिंग स्टोप्स} {फटाफट चालणाऱ्या पावलांचा आवाज} मी ह्यावेळी मंदिराकडे जात आहे. माहित नाही हि माझी भुरळ आहे कि खरोखर, पण मला मंदिरामधून कोणाच्या तरी हसण्याचा आवाज ऐकायला आला आहे. एका मुलीचा हसण्याचा आवाज. {रेकॉर्डिंग स्टोप्स} {हळू बोलण्याचा आवाज} हि माझी भुरळ नव्हती. माझ्या शिवाय पण इथे कोणी ह्या मंदिरात आहे. एक मुलगी. सारखं सारखं हसण्याचा आवाज मला ऐकायला येतोय, पण समझत नाही आहे कि कोणत्या दिशेपासून येत आहे. मी आवाजाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर वाटतं कि आवाज चारही बाजूने येत आहे. {रेकॉर्डिंग स्टोप्स} {हळू बोलण्याचा आवाज} हसण्याबरोबर आत्ता कोणाचं तरी चालण्याचा आवाज ऐकायला येतोय. हे बिलकुल एका हिंदी फिल्म मध्यला हॉरर स्टोरी प्रमाणे वाटतं आहे. एका मुलीचं हसण्याचा आवाज आणि चालताना पैंजण वाजल्याचा आवाज. कारण मंदिर खूप जुनं आणि मोठं आहे, हसायचा आवाज फिरतो आहे ज्याच्यामुळे मला नाही समझत आहे कि नीट आवाज कोणत्या दिशेने येतोय. {रेकॉर्डिंग स्टोप्स} {हळू बोलण्याचा आवाज} मला आत्ता आत्ता एका माणसाच्या बोलण्याचा आवाज ऐकायला आला आहे. मुलगी एकटी नाही आहे, कोणी मुलगापण तिच्या बरोबर आहे. जर मी गावाच्या लोकांची गोष्ट खरी समजली तर हि दोघं राजश्री आणि अजमल असायला हवेत. जे पण असो, थोड्या वेळात माहिती पडणार. {रेकॉर्डिंग स्टोप्स} {हळू बोलण्याचा आवाज} मला काहीच समझत नाही आहे कि हि माझी भुरळ आहे कि, कोणी माझी मस्करी करत आहे, पण मला ३ आवाज सारखं सारखं ऐकायला येत आहेत. एक मुलीच्या बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज, चालताना तिच्या पैंजणचा आवाज, आणि तिसरं एका मुलाचा हसायचा आणि बोलण्याचा आवाज. मी मंदिरात आवाजाचा पाठलाग करत चक्कर मारत आहे, पण आत्तापर्यंत काहीच दिसलं नाही आहे. {रेकॉर्डिंग स्टोप्स} {हळू बोलण्याचा आवाज} मी आत्ता एका भिंतीच्या पाठी लपून उभा आहे आणि माझ्या समोर जे मला दिसत आहे ते मला नाही माहित कि मी ते कसं सांगू. समोर मंदिराच्या मध्ये एका तलावाच्या किनाऱ्यावर एक मुलगा उभा आहे. जवळ जवळ ६ फुट उंच. लांब आणि रात्र असल्या कारणाने मी त्याचा चेहरा नाही बघू शकत पण त्याची सगळ्यात खास गोष्ट आहे त्याचा पेहनावा. मला नाही माहित जुने लोकं कोणता पेहनावा घालत होते पण जेवढं मी फिल्म मध्ये बघितलं आहे आणि पुस्तकात वाचलं आहे, ह्या मुलाचा पेहनावा हुबेहूब एका मुघल शिपाया सारखा वाटतं आहे. तो तलावाच्या इथे उभा राहून आजू बाजूला पहात होता, वाटतं त्या मुलीला शोधत आहे. {रेकॉर्डिंग स्टोप्स} {हळू बोलण्याचा आवाज} हे जर मला घाबरवण्याच किंवा धोखा द्यायचा प्रयत्न करत आहे वा कोणी माझ्या बरोबर मस्करी करत आहे तर ह्याच्यावर भरपूर मेहनत केली आहे. मी आत्ता पण लपलेला आहे आणि आत्ता त्या मुलाबरोबर ती मुलगी पण आहे. मी एकदम स्पष्ट त्या दोघांना पाहू शकत नाही आहे, कारण मला नाही माहित माझ्या समोर जे होत आहे ते काय आहे? काय मला टाळी वाजवत बाहेर यायला हवं कि जे जसं चाललंय आहे ते तसचं चालत राहू दे मला नाही माहित. मी त्या दोघांचा चेहरा आत्तापण पाहू शकत नाही आहे. रात्र असल्या कारणाने मी त्यांचे फक्त कपडे साफ दिसत आहे पण त्यांचे चेहरे लपलेले आहेत. मुली ने कोण्या जुन्या राजकुमारी सारखे कपडे परिधान केले आहेत आणि एवढं सोनं अंगावर घातलं आहे कि चालत असताना पण त्यांचा आवाज छन छन ऐकू येत आहे. {रेकॉर्डिंग स्टोप्स} {हळू बोलण्याचा आवाज} Ohh God, Ohh God. जे मी सध्या आत्ता बघत आहे ते मी खरं समझू कि खोटं. मला पहिल्यांदा त्या मुलाचा चेहरा दिसला. चेहरा आत्तापर्यंत का नाही दिसला होता कारण त्याचा चेहरा ह्या प्रकारे सफेद होता कि जसा सफेद पेंट केला आहे. रात्र असल्या कारणाने मला त्याचा तो सफेद चेहरा नीट दिसत नव्हता. {रेकॉर्डिंग स्टोप्स} {जोर जोरात श्वास घेण्याचा आवाज} मला त्या दोघांनी बघितलं आहे. मीने त्यांचे फोटो घेण्याचे प्रयत्न केलं आपल्या मोबाईल वरती पण फ्ल्याश ऑफ करायचा विसरलो. फ्ल्याश मुळे त्या दोघांनी मला बघितले. मी मंदिरामधून निघण्याचा प्रयत्न करत आहे. {जोरात ओरडण्याचा आवाज} OHH GOD...!!!! {टेप रेकॉर्डर खाली पडण्याचा आवाज} Listen dude, i am sorry. मी तुम्हा दोघांना नाही बघणार होतो. Please don't come near me. Stay away. I dont want trouble and i dont want to fight. आह...आह....ऊ.... ऊ... नो नो .. What are you? Your face... your face... {मुलीच्या हसण्याचा आवाज} Ohh God...!!! प्लीज... जाऊ द्या मला, काहीच नाही बघितलं मी.... {रडायचा आवाज} लांब राह माझ्यापासून. माझ्या जवळ नको येवूस. {कुत्र्या सारखं गुर्ण्याचा आवाज} हाथ नका लाऊ मला... लांब राह माझ्यापासून... नो, नो, नो.... आ..आह. {श्वास कोंडल्याचा आवाज} Please dont... your hand... so cold... so cold... dont touch me... so cold... your face, your eyes... {रडायचा आवाज} Please.. let me go. मीने काहीच नाही पाहिले. Oh God !!!! आह... नो नो नो. {हळू हळू लांब सरपटत जाणारा आवाज, मुलीचं हसण्याचा आवाज, पैंजणच आवाज, रडण्याचा आवाज} "ह्याच्या नंतर सगळं शांत आहे साहेब. रेकॉर्डिंग होत राहिली आणि टेप संपली पण काहीच आवाज नाही आला" एका हवालदाराने इन्स्पेक्टर कडे बघत बोलला. "हम्म.." इन्स्पेक्टर उठून जवळ आला. "त्याचा मोबाईल पण भेटला आहे, त्या रात्रीच हे एक चित्र आहे त्या मंदिराचं. बघा..!!" हवालदाराने एक चित्र ओपन करून मोबाईल इन्स्पेक्टरला दिला. "काहीपण तर दिसत नाही आहे.." "तिथे नाही साहेब. इथे समोर तलावा जवळ बघा. कोणच नाही उभा पण पाण्यात सावली बघा. एक मुलगा आणि एक मुलगी. बिलकुल तसाच जसं त्याने टेप मध्ये सांगितलं आहे." "टेप कुठे भेटला?" इन्स्पेक्टर ने विचारले. "मंदिरात पडलेला भेटला साहेब आणि त्याचा मृतदेह पिंपळाच्या झाडा खाली सापडला."