Get it on Google Play
Download on the App Store

कोकणातील सहल

माझ्या शाळेची सहल एकदा कोकणात
जायची ठरली होती. तिथे आम्ही 4 दिवस
थांबणार होतो. तेव्हा मी फ़क्त 15
वर्षांचा होतो. आमची सहल शुक्रवारी निघणार
होती म्हणुन
मी आदल्या रात्री सगळी तयारी करुन
ठेवली होती. उद्या सकाळी आम्ही सर्व जण
कोकणात जाणार होतो या विचाराने
मला फ़ारआनंद होत होता. सकाळी 6
वाजता निघायचे होते म्हणुन रात्री लवकर झोपावे
असे वाटले परंतु काही केल्या मला झोपच येत
नव्हती. कदचीत उत्साहामुळे मला झोप लागत
नव्हती
पण काही वेळानंतर मला गाढ झोप लागली.
त्या रात्री मला अचानक जाग
आली आणि मी उठुन बसलो. तेव्हा रात्रीचे 2
वाजले हॊते हे मला चटकन कळ्ले कारण
तेव्हा आमच्या घरातल्या मोठ्या घड्याळात दॊन
ठोके पडत होते.
मला तहान लागली होती म्हणुन
मी पाणी प्यायला गेलो तेव्हा भिंतीवरच्या कॅलेंडर
कडे माझे लक्ष् गेले तेव्हा मी पाहिले कि 2
दिवसा नंतर अमावस्या आहे. मी नंतर परत
झोपायला गेलो. पड्ल्या-
पड्ल्या मला गुंगी आली आणि मी झोपी गेलो.
अचानक अलार्म वाजला आणि पाहिल तर 5
वाजलेले. मी उठलो आणि सर्व तयारी केली.
मी शाळेत पोहचलो तेव्हा माझे मित्र माझी वाट
पाहत होते.
आम्ही बस मधे बसलो आणि आमचा प्रवास सुरु
झाला. दुपार पर्यंत आम्ही कोल्हापुर
ला पोहचलो होतो.
आम्ही जेवणासाठी थांबलो तेव्हा त्या ढाब्यावर
इतर लोकही जेवत होते
तेव्हा आम्ही सर्वांनी जेवायला बसलो.
गप्पा चालु होत्या, जोक, गाणी या सर्वांन मधे
एक गोष्ट मला अढळ्ली की एक माणुस
आमच्या कडे वेगळ्याच नजरेने पाहत होता.
मी त्याच्या कडे गेलो, तो एक म्हातारा माणुस
होता केस वाढ्लेले, नख काळी पड्लेली अत्यंत
विचित्र असा तो माणुस होता तो.
त्याला मी हिंमत करुन विचारले
की तो आमच्याकडे असा का बघत आहेस?
त्यावर तो उत्तर द्यायच्या जागी मलाच विचारु
लागला पण त्याला पाहुन मला परत तोच प्रश्न
विचारण्याचा धीरच झाला नाही. त्याने विचारले ''
कुठे जाताय तुम्ही "?
मी सांगितले की कोकणात देवगडला जात आहोत
आम्ही.
" देवगडला कुठे ?
परबांच्या बंगल्यावर आ........
मी वाक्य पुर्ण करण्याच्या आतच तो गंभीर
चेहरा करुन म्ह्णाला “तुम्ही तिथे जाउ
नका परवा अमावस्या आहे. तुम्ही तेथे जाणे
योग्य नाही. तेथे फ़ार भयान....................
पुढे काही सांगणार इतक्यात
माझ्या मित्रांनी मला हाक मारली. मी मागे
पाहील आणि विचारल काय झाल?
ते म्हणाले" काय करत आहेस तु तिथे बसून
काय करत आहेस?
मी म्हणालो " अरे ह्या आजोबांबरोबर बोलत
आहे"
ते म्हणाले " कोन आजोबा"
मी म्हणालो " हे काय माझ्या समोर बसले आहेत
"
आणि मी समोर पाहिले तर तिथे कोणीच नव्ह्ते.
मला जरा वेळ धक्काच बसला. मग मित्र
माझ्या जवळ आले आणि विचारल कि बरा आहेस
ना?
काही होतय का तुला?
मी जरा सावरुन म्हणालो “नाही काही नाही."
-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\
बराच वेळ मी त्या प्रसंगाबद्दल विचार करत
राहीलो. का कुणास ठाउक
त्या व्यक्तिचा आवाज आणि चेहरा मला परिचीत
वाटत होता. आता आमची बस ढाब्याहुन
पुढ़च्या प्रवासासाठी निघाली.
आम्ही काही तासातच अंबोली घाटात
पोहचलो होतो. घाट सुरू झाला तसा माझ्या मनात
त्या व्यक्तिचे विचार सुरू झाले. घाट संपत
आला तसा त्याच्या शेवटच्या वळणावर तोच
विक्षीप्त व्यक्ति एका दगदावर बसुन मला हाक
मारत होता. आता तर माझी मती गुंग झाली,
मी मित्रांना जोर जोरात हाका मारत होतो परंतु ते
माझ्याकडे पाहतच नव्हते.
अचानक माझ लक्ष एका दगडाकडे गेले
आणि मी सुन्नच झालो..........................
..........!!!!!!!!!!!!!!!
आमची बस पुढे सरकतच नव्हती. सर्व
काही स्तब्ध . आता मला कळ्ले की माझे मित्र
मला ओ का देत नव्ह्ते . ते थिजल्या प्रमाणे उभे
होते काहिच हालचाल नव्हती.
अगदी त्यांना चिमटा देखील काढला परंतू मेणाचे
पुतळे ज्याप्रमाणे जिवंत वाटतात त्याप्रमाणे ते
झाले होते. आता मात्र माझा जिव
कंठाशी आला होता. आणि त्यात भर म्हणून
तो म्हातारा माणुस आमच्या बसकडे येत होता.
मी मनातल्या मनात देवाच नामंस्मरण सुरू केल.
तो माणुस पुढे येत होता.
आता तो माझ्या खिड्की समोर येउन थांबला.
तो म्हणाला “घाबरू नकोस पोरा,
मी तुला काहिही करणार नाही."
का कुणास ठाउक त्याच्या या शब्दांमधे एक
वेगळीच आत्मीयता व प्रेम होतं.
तो म्हणाला “मघाशी जी गोष्ट
सांगायची होती ती राहून गेली म्ह्णुन मी इथे
आलो आहे.”
आणि तो पुढे सांगूलागला “-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\
-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-\-
-\-\-\-\-\-\-\-\- ".
हे सर्व मला खुप आश्चर्यकारक व तितकेच
भितीदायक वाटले. मी या विचार करत
होतो तितक्यात तो व्यक्ती अदृयृश झाला व
एक हवेचा झोत माझ्याकडे आला आणि काय
आश्चर्य बस पुन्हा चालु लागली. माझे मित्र
पुन्हा हालचाल करु लागले आणि माझे लक्ष
माझ्या हातावरील घड्याळावर गेले आणि अजुन
एक झटका मला बसला. आमची बस
ज्या क्षणी थांबली तेव्हापासुन आत्ता पर्यंत
एकही कक्षणही उलटला नव्हता.
माझ्या चेहरयाचा उडालेला रंग़पाहून एका मित्राने
मला विचारले" काय रे बाहेर काय पाहतोय तु
केव्हापासुन आणि तुझ्या चेहरयाचा रंग
का उडालाय”?
मी म्हणालो “तुला काही जाणवल का तू फ़ार वेळ
स्तब्ध होतास "?
त्यावर तो मला म्हणाला “काय रे बरा आहेस
ना? मघाशी त्या ढाब्यावर सुध्दा एकटाच
बडबडत होतास."
मी खाली मान टाकली आणि ह्ळु आवाजात
म्हणालो “काही नाही ".
या दोन प्रसंगानंतर मात्र मला विचार करण्यास
भाग पाडले की खरच भुताच अस्तित्व या जगात
आहे की नाही. आज पर्यंत
मी समजायचो की भुत फ़क्त अंधश्रध्दा आहे.
आज जेव्हा माझ्यावर तो प्रसंग
ओढावला तेव्हा मी कोणत्याही तत्वाचा विचार
केला नाही फ़क्त एकच गोष्ट मनात
होती ती म्हणजे स्वतःचा जिव वाचवणे.
इतका सखोल विचार मी प्रथमच करत होतो.
आज मला जीवनानंतरचे आयुष्य
अक्षरशः अनुभवायला मिळाले.
हा सर्व विचार सुरु
असतांना आम्ही केव्हा कोकणात पोहचलो ते
मला कळलेच नाही. आम्ही संध्याकाळच्या 6
वाजता देवगडला पोहचलो. अत्यंत हिरवागार
परिसर
शुध्द हवा आणि नारळाच्या बागा. हे सर्व दृश्य
पाहिल्यानंतर माझ्या बरोबर
घडलेल्या घटनांचा विचार व दिवस
भराचा थकवा लगेच पळुन गेला.
आम्ही संध्याकाळी फ़्रेश होउन समुद्रावर गेलो.
तिथे थंड हवा आम्हाला जणू बोलावतच होती.
मावळता सुर्य आम्हाला सुंदर रात्रीची भेट देउन
जात होता. आम्ही सुमारे 8 च्या दरम्यान
परबांच्या वाड्यावर पोहचलो.
वाडातसा जुना होता तरी त्याची भव्यता थक्क
करणारी होती. आम्ही वाड्यात
गेलो तेव्हा मला त्या हवेत एक
दुःखी भावना जाणवत होती. अचानक माझ मन
दुःखी झाल. मला त्या वाड्यात राहावस वाटत
नव्हत. म्हणुन मी माझ्या मित्रांना ही गोष्ट
सांगायला जाणार तितक्यात
मला बंगल्याच्या परसात एखादी लहान
मुलगी खेळत असल्याचा भास झाला. मी परसात
गेलो तर तिथे कोणीच नव्हते.
मी मागे फ़िरणार इतक्यात कोणीतरी माझा हात
पकडला. मी घाबरलो आणि धिर करून मागे पाहिले
तर एक लहान मुलगी इनमिन 8-9
वर्षांची माझा हात पकडून उभी होती.
अगदी गोंडस. तिने मला म्हटले “दादा तु इथे
नवीन राहायला आला आहेस?"
त्याची मला प्रश्न
विचारतांनाची निर्भयता आश्चर्यकारक होती.
इतकी लहान
मुलगी एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर
इतक्या सहजतेने कशी बोलु शकते
या गोष्टीचा विचार मी करत होतो. मनात कुतूहल
होत. तिला पाहुन मला माझ्या लहान
बहिणीची आठवण आली. इतक्या प्रवासात
माझी आपुलकिने विचारणारी व्यक्ती प्रथमच
भेटली. आणि तिही एक लहान मुलगी.
मी तिला विचारले की तु कुठे राहतेस?
त्यावर ती म्हणाली “जवळच जी चाळ आहे
ना तीथे 12 वी खोली आमची आहे.”
ठिक आहे इतक्या रात्री तु इथे कशी तुझे आई -
वडिल कुठे आहेत? मी विचारले. त्यावर ती हसुन
म्ह्णाली “मी नेहमी येते इथे
मला भिती नाही वाटत रात्री फ़िरायची". यामुळे
मला तिचे अप्रुप वाटु लागले. एखादी लहान
मुलगी इतकी धिट असु शकते याचि कल्पनाच
मी कधी केली नव्हती. तीला मी वाड्यात
बोलावले तेव्हा मात्र तिच्या चेहरयावर
गंभीरता आली. ती म्हणाली “असु दे नंतर
कधीतरी" आणि तिथुन निघुन गेली. माझ्याकडुन
एक गोष्ट राहुन गेली ति म्हणजे तिला तिच नाव
विचारणे. मी विचार केला आता चार दिवस
आलो आहोत तर होइल परत भेट
आणि मिही वाड्यात परतलो.
त्या मुलीला भेतल्यानंतर मी वाड्यात जात
असतांना मला कुणीतरी माझा पठलाग करत
असल्याचा भास झाला , मी मागे वळुन पाहील तर
मागे कुणीच नव्हतं. मी माझ्या मित्रांकडे
गेलो तेव्हा सर्वांना रुम वाटण्यात आले होते.
मला तिथे वरच्या मजल्यावर रुम मिळाला.
जेव्हा मी पायरया चढत
होतो तेव्हा त्यांचा तो किर-किर आवाज
त्या शांत वातावरणात मन सुंन करनारया होता.
हळु हळू मी वर जाउ लागलो तस तसा वाड्यातील
वातावरणात मला एक वेगळाच दमटपणा व
भितीदायक आवाज येउ लागले. मनाचा धीर ख़चत
चालला होता. अंगावर घाम आणि पायात
मुंग्या आल्या . मला एक एक पाउल टाकण
कठीण जाउ लागल . निराशा चालुन
आल्याची भावना घेउन जीव
कंठाशी आला असतांना ख़ोली पर्यंतच अंतर
वाढत असल्याचे जाणवले.आता मला पुढे जाणे
शक्य नव्हते. मी मागे फ़िरलो आणि अचानक एक
12 - 13 वर्षांचा मुलगा माझ्या समोर
उभा राहीलेला मी पाहिला . चेहरयावर तेज
आणि हसरया चेहरयाने तो माझ्याकडे पाहत
होता. त्याच्या चेहरयावर कोणत्याच
प्रकारची भिती नव्हती.तो आल्यानंतर मात्र
आजुबाजूच्या वातावरणात कमालीचा फ़रक
जाणवला.
मी त्याला विचारले " तु कोण आणि इथे कसा?
" या प्रश्नावर त्याने शांतपणे मला उत्तर दिले
की " मी तुला तुझ्या रुमपर्यंत
सोडायला आलो आहे. त्याच्या उत्तराने
मला बुचकाळ्यात पाड्ले.कारण तो मला ओळखत
होता परंतु मी नाही. वर तो मला धीर
यावा अशा गप्पा मारत होता.
मी त्याला विचारल " तुला कस कळाल
की मी घाबरलो आहे." त्यावर त्याचे उत्तर होते
कि " मी इथेच जवलच राहतो त्यामुळे इथे
येणारया लोकांची अवस्था कशी होते
याची मला कल्पना आहे."
त्याच उत्तर पुरेस आणि योग्य वाटल म्हणुन
मी त्याला म्हटले चल मी तुला वेफ़र्स देतो . रुम
पर्यंत तो माझ्या बरोबर चालत होता .
रुमच्या जवळ गेल्यावर मी त्याला म्हणालो आत
ये इथे बसुन वेफ़र्स खा . तर यावर
तो म्हणाला मी आत येत नाही मला लवकर
जायचे आहे. मग मी त्याला म्हणालो चालेल हे
पाकीट घरी घेउन जा.
पाकीट काढण्यासाठी मी बॅगमधे हात
घातला आणि मागे फ़िरलो तर काय
तो मुलगा नव्हताच तिथे. मला वाटल घाइत
गेला असेल. मग मी रुम मधे जरा पहाणी करु
लागलो . पलंग व्यवस्थित करुन मी फ़्रेश
व्हायला बाथरुम मधे गेलो.
बाहेर आल्यानंतर समोरच दृश्य पाहुन मला राग
आला. कारण कुणी तरी सर्व सामान
अस्ताव्यस्त करुन टाकल होत. मी बाहेर जाउन
पाहिल तर जिन्यावर कुणिच नव्हतं. माझ मन
या प्रसंगाची जमेल तितकी कारणे शोधू लागला .
पण आधीच्या प्रसंगांनी माझे मन अस्वस्थ होउ
लागले आणि अचानकच मला चक्कर
आली.......