Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

गर्भपाताचा कायदा

एखादया गरोदर बाईच्या घरातील माणसे तिचा गर्भ मुलाचा की मुलीचा हे तपासून मुलीचा गर्भ पडायचा विचार करत असतील तर तिला आणि तिच्या घरच्यांना सल्ला मिळणे आवश्यक आहे.

या कायदयानुसार गर्भपात करण्याबाबत काही गोष्टींचे बंधन सरकारने घातले आहे.

  • गर्भलिंग तपासणी करून गर्भ पाडणे हा कायदयाने गुन्हा आहे. गर्भपात मान्यताप्राप्त सरकारी केंद्रातच करणे बंधनकारक असते.
  • आईच्या आरोग्याला कोणताही अपय न करता २० आठवड्यांच्या आतील गर्भ सरकारी मान्यता असणाऱ्या ठराविक केंद्रांमध्येच प्रमाणित वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच करावा, असा शासनाचा कटाक्ष आहे.
  • १८ आठवड्यांच्या पुढील गर्भ असल्यास दोन प्रमाणित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह्या वैद्यकीय गर्भपातासाठी आवश्यक असतात.
  • स्त्री जर १८ पेक्षा कमी वयाची असेल अथवा ती मतिमंद असेल तर तिच्या आई-वडिलांची व ते नसल्यास अन्य पालकांची लेखी संमती वैद्यकीय गर्भपातासाठी आवश्यक असते.
  • आपण बघतो की बरेचदा गर्भपात गुपचूप करून घेतला जातो. काहीजण काही गावठी उपाय करण्याच्या फंदात पडतात. काहीवेळा कुठेतरी एखादया छोटया सेंटरमध्ये गर्भपात उरकला जातो. अशा ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर नसल्याने बाईच्या जीवाला धोका होऊ शकतो. वंध्यत्व येऊ शकते. गर्भपाताचे हे धोके टाळण्यासाठी आत सरकारने गर्भपाताचा कायदा केला आहे. पूर्वी गर्भपात करणे हा गुन्हा होता पण आता गर्भपाताला सरकारी मान्यता मिळालेली आहे. एवढंच नाही तर कोणत्याही सरकारी दवाखान्यात तो केला जातो. याबाबत चाललेले बेकायदा गर्भपात रोखून स्त्रियांच्या आरोग्याला होणारे धोके कमी करणे हाच मुख्य हेतू आहे.