Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

पहिली तिमाही

पहिली तिमाही टळलेल्या पाळी पासून पहिले तीन महिने(१२ आठवडे) हा काळ मानला जातो. स्त्रीमधील अंतरस्त्रावांमुळे स्तनाग्रे व बाजुच्या भागात रंगात बदल होऊन ग़डद (Dark) होतो. बाळाच्या वाढीतले सुरुवातीचा हा काळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. यात वाढीचे खालील टप्पे असतात.

फलन- पाळीच्या सामान्यतः १४व्या दिवशी स्त्रीबीज तयार होतो. त्यादरम्यान होणाऱ्या समागमात मिळणाऱ्या शुक्रजंतू योनीमार्गातून गर्भाशयात पोहचतात. ते गर्भनलिकेत एकत्र येतात. शुक्रजंतू स्त्रीबीजात प्रवेश करतात व स्त्रीबीजाचे फलन होते.

निषेचनानंतर पहिले आठ आठवडे व शेवटच्या मासिक पाळीनंतर दहा आठवडे पर्यंत वाढत जाणा-या गर्भपेशी समूहास भ्रूण म्हणण्याची पद्धत आहे. त्यानंतर बाळाचा जन्म होईपर्यंत त्यास अर्भक म्हणतात.

पहिल्या तिमाहीमध्ये भ्रूण परिसरातील व पर्यावरणातील बदलास अधिक संवेदनक्षम असतो. या काळात भ्रूणाचे बहुतेक सर्व अवयव तयार होण्याची प्रक्रिया चालू असते. भ्रूणवृद्धि होत असता त्याभोवती एक पातळ उल्ब आवरण तयार होते. या आवरणामुळे भ्रूणाचे संरक्षण होते. उल्बावरणामध्ये उल्बद्रव असतो. या द्रवामुळे भ्रूणाचे तापमान बदलापासून आणि धक्क्यापासून गर्भाचे प्रसूतिपर्यंत रक्षण होते. गर्भ गर्भशय्येमध्ये रुजल्यानंतर गर्भशय्येतील रक्तवाहिन्यांची तोंडे उघडतात. त्यातून वाहणारे रक्त पोषजनक पेशीतील पोकळ्यामध्ये पसरते. पोषजन्य पेशींचे भरीव स्तंभ आणि रक्तपोकळ्या यांची गुंतागुंतीची जालिकाकार रचना तयार होते. प्रथम रसांकुर,द्वितितक रसांकुर आणि तृतियक रसांकुर अशा रचनेमुळे मातेचे रक्त आणि त्यामधील पोषक दृव्ये व भ्रूण पेशीमधून बाहेर आलेली अपशिष्टे यांची अदलाबदल या रचनेमध्ये होते. निषेचनानंतर सु. सतराव्या दिवशी अशा प्राथमिक वारेची निर्मिती होते. गर्भाच्या वाढीबरोबर वार गर्भाशयाच्या घुमटाकार बाजूस आतून चिकटते. प्रसूति होईपर्यंत गर्भाचे पोषण वारेतून आणि गर्भाशयास चिकटलेल्या अपरेमधून होते. अपरेमधून एचसीजी (ह्यूमन कोरिऑनिक गोनॅडोट्रोपिन) ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. प्रोजेस्टेरॉन हे गर्भरक्षक संप्रेरक आहे. प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशयाचे आकुंचन होत नाही. आणि गर्भ प्रसूतिपर्यंत वृद्धिक्षम राहतो. गर्भावस्थेच्या चवथ्या आठवड्यात गर्भाची सर्व महत्त्वाची इंद्रिये विकसित झालेली असतात. मज्जारज्जू,मेंदूपोकळ्या तयार होतात. हृदयपेशींचे आकुंचन चवथ्या आठवड्यात चालू होते. अवयवबुंध दिसायला लागतात. आठव्या आठवड्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या अवयवांची अभिसरणसंस्था,चेतासंस्था, पचनसंस्था,आणि वृक्क व उत्सर्जन संस्था विकसित झालेल्या असतात.

  • ५ आठवडे- पहिल्या पाच आठवड्यात भ्रुण तयार होऊन त्याबदल होतात. भ्रुण एकपेशीय कडून बहुपेशीय प्रकाराकडे रुपांतरीत होत असतो.
  • ७ आठवडे- गर्भामध्ये बदल होऊन र्हतदय सुरु होते. अंडमध्य तयार होऊन त्यापासुन इतर अवयव तयार होण्यास प्रारंभ होत असतो.
  • १२ आठवडे- हाडांची निर्मिती सुरु होते.