Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

प्रसवोत्तर काळ: शारीरिक बदल

ही वेळ प्रसूतीनंतर दुस-या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंतची असते. ह्या कालावधीमध्ये योनी मार्गात अधिकांश बदल होतात. शक्यतः हीच वेळ आपल्या “आई”च्या नवीन भूमिकेत जास्तीतजास्त अंगवळणी पडण्याची असते. आपण आपल्या बाळाला घेऊन आपल्या घरी जाता. तुलनात्मक दृष्टीने अजून काही लहान, पण महत्त्वाचे शारीरिक बदल आहेत जे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

यात खालील बाबी अंतर्भूत आहेत:

लोकिया/योनीतून स्त्राव होणे:

म्हणजे मुख्यत: गर्भाशयाचा आतली बाजू झडून योनीतून स्त्राव होतो. पहिल्या चार दिवसांत रक्तस्त्राव जास्त असतो, जसे मसिक पाळीत होते. शक्यतो एकाच वेळी दोन पॅड वापरावे लागतात आणि दिवसातून ३-४ वेळा ते बदलावे लागतात. पण जर अती प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल किंवा रक्ताच्या गुठळ्या बाहेर पडत असतील, तर आपल्या डॉक्टरांना याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. बहुदा पाचव्या दिवसापर्यंत स्त्राव कमी होतो आणि तो शक्यतो लालसर पिवळ्या ते तपकिरी रंगात असतो. आपल्याला तरीही दिवसात 2-3 पॅड वापरावे लागू शकतात. बहुदा हा स्त्राव दुस-या आठवड्यापर्यंत थांबतो. त्यानंतर स्त्राव पांढ-या रंगाचा होतो. एपीसियोटोमी (चीरा) ची चांगली स्वच्छता आणि काळजी घेतली तर आजारांच्या संक्रमणापासून वाचता येऊ शकते. कोणताही दुर्गंधीयुक्त स्त्राव होत असेल तर याची आपल्या डॉक्टरांना जाणीव करून देणे आवश्यक आहे.

लघवीला जाणे:

पहिल्या दिवशी आपण किमान दर २-३ तासांमध्ये एकदा लघवीला जायला पाहिजे, जरी टाक्यांमुळे त्रास होत असला तरीही. कारण आपल्याला जाणीव न होता आपले मूत्राशय भरू शकते. यामुळे नंतर समस्या होऊ शकते, विशेषकरून आजारांचे संक्रमण. पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात लघवीला जावेसे वाटेल. याचे कारण असे आहे की आपले शरीर जास्त प्रमाणात असलेले पाणी आणि क्षार शरीरातून बाहेर टाकते जे गरोदरपणात शरीरात साचलेले असते.

शौच:

प्रसूती नंतर पहिल्या दोन दिवस आपल्याला व्यवस्थित शौचास होत नसेल याची वेगवेगळी कारणे आहेत. एक कारण हे की प्रसूतीवेदनांच्या वेळेस आपण काही खाल्लेले नसेल, आपण फार थकलेले असाल आणि आपल्याला झोप येत असेल. दुसरे कारण हे आहे की आपल्याला टाके घातलेल्या ठिकाणी दुखत असेल. अशा वेळी आपण आहारात जास्त प्रमाणात तंतुमय आणी तरल पदार्थ घेणे आवश्यक आहे. आपल्याला सारक (लॅक्झेटिव्ह) औषधांची सुद्धा गरज भासु शकते.

स्तन:

पहिल्या दिवशी आपल्याला आपल्या स्तनांतून फक्त पाणसट, पिवळट स्त्राव येईल, तो ख-या दूधासारखा वाटणार नाही. ह्याला कोलोस्ट्रम असे म्हणतात आणि त्यात पोषक तत्त्वे जास्त प्रमाणात असतात जी आपल्या बाळाला आवश्यक असतात. या वेळेत आपल्याला बाळाला पाजावे लागते. तिस-या दिवसापर्यंत दुधाचे प्रमाण जास्त होते, याचे कारण हे की आपल्या शरीरात अंतस्त्रावांमध्ये (हार्मोन्स) बदल होतो. स्तनांचे आटणे (एनगोर्जमेंट) टाळण्यासाठी नियमित स्तनपान करणे आवश्यक आहे.