सिंहासन बत्तिशीची कथा क्र.18 (विश्वासघात)
राजा विक्रमादित्यच्या दरबारात एकापेक्षा एक विद्वान होते. राजा त्यांना सन्मानाने वागवत होता. दुसर्या राज्यात ते आपल्या बुध्दीचा उपयोग करून अनेक बक्षीसेही जिंकून आले होते.
एके दिवशी राजा विक्रमाच्या दरबारात दक्षिण भारतातील एका राज्यातील एक विद्वान आला होता. ''विश्वासघात'' हा जगातील सगळ्यात नीच कर्म आहे, हे पटवून देण्यासाठी त्याने राजाला एक कथा सांगतिली.
आर्यावतमध्ये अनेक वर्षांपूर्वी एक राजा राज्य करत होता. त्याने वयाच्या सत्तरीत एक रुपवती तरूणीशी विवाह केला. तो एक क्षण ही राणी त्याच्यापासून दूर राहत नसे. राजा त्याच्या नव्या राणीला दरबारात आपल्या नजरेसमोरच बसवत असे. राजासमोर बोलण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती. मात्र राजाच्या गैरहजेरीत राज्यात त्याच्याविषयी वाईट चर्चा केली जात होती राजाच्या महामंत्रीला मात्र या गोष्टीचे वाईट वाटत होते. राजाला त्याने राज्यात त्याच्याविषयी सुरू असलेला प्रकार सांगितला.
त्याने राजाला सल्ला दिला कि, राणीसाहेबांची एक मोठी प्रतिमा तयार करून राजसिंहासनाच्या समोर ठेऊन द्यावी. असे केल्याने जनतेमध्ये सुरू असलेली उलटसूलट चर्चा थांबेल.
महामंत्रीची प्रत्येक गोष्ट राजा ऐकत असे. महामंत्रीने कुशल चित्रकाराकडे नव्या राणीची चित्र तयार करण्याचे काम सोपवले. राणीचे चित्र तयार झाले. ते राजदरबारात आणण्यात आले. चित्र इतके सुरेख होते की, सगळे चित्रकाराची प्रशंसा करत होते. राजालाही राणीचे चित्र फार आवडले होते. ते चित्र जिवंतच वाटत होते. तितक्यात राजाचे लक्ष राणीच्या चित्रातील राणीच्या जांघवर गेली. चित्रकाराने तेथे एक तिळ काढून ठेवला होता. राजाच्या मनात शंका आली की, चित्रकाराने राणीचे गुप्त अंगही पाहिले आहे.
राजा भडकला. चित्रकाराला सत्य विचारण्यात आले. चित्रकाराने सत्य सांगूनही राजाने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. राजाने जल्लादांना बोलावून चित्रकाराला ठार मारण्याचा हूकूम काढला. चित्रकार सत्य सांगत होता. हे महामंत्री यांनी ओळखले होते. जंगलाच्या रसत्याने महामंत्रीने जल्लादांना धनाचे लालच दाखवून चित्रकारला मुक्त केले होते. हरणाला मारून त्याचे डोळे राजासमोर सादर करण्यास सांगतले. चित्रकार वेश बदलून महामंत्रीबरोबर राहू लागला.
काही दिवसानंतर राजाचा मुलगा शिकार करण्यासाठी गेला. तर एक वाघ त्याच्या मागे लागला. राजकुमार एका झाडावर चढून बसला. तितक्यात झाडावर असलेल्या अस्वलावर त्याचे लक्ष गेले. राजकुमार घाबरला. परंतू अस्वलाने त्याला निश्चित्न राहण्यास सांगितले. तोही वाघाच्या भीतीने झाडावर चढला आहे, असे त्याने सांगितले. वाघ भुकेने व्याकूळ झाला होता. तो त्या झाडाखाली बसला होता.
राजकुमारला आता झोप लागत असल्याचे पाहून अस्वलनाने राजकुमाराला स्वत:कडे बोलावून घेतले. राजकुमार झोपला असताना वाघाने अस्वलाला राजकुमाराला खाली ढकलून देण्यास सांगितले, मात्र अस्वलाने मान्य केले नाही. राजकुमार झोपेतून जागी झाला. अस्वलची झोपण्याची पाळी होती. राजकुमार जागी होता. वाघाने राजकुमारला अस्वलाला खाली ढकलून देण्यास सांगितले. राजकुमार वाघाच्या बोलण्यात येऊन गेला. तो अस्वलला खाली ढकलणार तोच अस्वल जागे झाले. त्याने राजकुमारला विश्वासघाती म्हणून त्याला मुका करून टाकले.
वाघाला कंटाळा आला व तो जंगलात निघून गेला. राजकुमार मुका झाल्याची बातमी राज्यात वार्यासारखी पसरली. मात्र राज्यातील कोणत्याची वैद्याला राजकुमाराचा आजार बरा करता येत नव्हता. शेवटी महामंत्रीच्या घरात असलेला चित्रकार वैद्याच्या रूपात राजाकडे गेला. त्याने राजकुमारच्या चेहर्यावरील भाव पाहून राजकुमार मुका झाला आहे, हे ओळखले. राजकुमार रडायला लागला. राजकुमार मोठमोठ्याने रडल्याने त्याचे गेलेली वाणी परत आली. राजा आश्चर्य वाटले. तेव्हा चित्रकाराने उत्तर दिले की, प्रत्येक कलाकराला आंतर्मन ओळखण्याची दृष्टी असते. अशाच पध्दतीने चित्रकाराने राणीच्या जांघवरील तिळ पाहिला होता. राजाच्या सारे काही लक्षात आले. राजाने चित्रकाराची क्षमा मागितली. राजाने त्याच्या सन्मान करून त्याला मोठे बक्षीस देऊन रवाना केले.
दक्षिणच्या विद्वानाने राजा विक्रमादित्यला अशी कथा सांगितली. राजा प्रसन्न झाला. राजाने त्याचा सत्कार करण्याचे ठरविले. त्याला लाख सुवर्ण मोहरा देऊन रवाने केले.