सिंहासन बत्तिशीची कथा क्र.4 (कामकंदला)
कामकंदला कथा सांगू लागली...
एके दिवशी राजा विक्रमादित्यच्या दरबारारात एक ब्राह्मण आला होता. राजा विक्रमाने त्याला येण्याचे प्रयोजन विचारले. ब्राह्मण म्हणाला, ''मान सरोवरमध्ये सूर्योदय होताना एक खांब प्रगट होतो. सूर्य जसा माथ्यावर येतो तसा तो खांब ही मोठा होतो व सूर्याची उष्णता जशी कमी होत जाते, तसा तो खांब लहान होतो. सूर्यास्ताच्या वेळी तर तो पाण्यात विलीन होऊन जातो. समुद्राला सोडून सूर्याची उष्णता सार्या ब्रह्माण्डामध्ये कोणीच सहन करू शकत नाही, असा सूर्याचा गर्व आहे, असे त्या ब्राह्मणाने राजाचा सांगितले.
मात्र देवराज इंद्राचे मानने आहे की, मृत्युलोकातील एक राजा सूर्याच्या उष्णतेची कुठलीही पर्वा न करता त्याच्या जवळ जाऊ शकतो व तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून राजा विक्रमादित्य आहे. हे ऐकून राजा खूष झाला त्याने ब्राह्मणास दक्षिणा देऊन रवाना केले.
सकाळच्या पहरी राजा एका जंगलात पोहचला. एकान्त पाहून त्याने देवी कालीद्वारा प्रदत्त दोनही वेताळांचे स्मरण केले. स्मरण करताच दोन वेताळ राजाच्या सेवेसाठी उपस्थित झाले. राजा विक्रमाला ते वेताळ मानसरोवराच्या काठी घेऊन गेले. राजा व दोन्ही वेताळांनी रात्री तेथील जंगलात घालवली. सकाळ होताच ज्या ठिकाणाहून खांब बाहेर आला. राजाने त्याकडे लक्ष केंद्रीत करून सूर्याची किरणे पाण्यातून वर पडताच राजा विक्रमाने लगेच पाण्यात उडी घेऊन खांबापर्यंत पोहचला व खांबावर चढून बसला. जस जशी सूर्याची उष्णता वाढत गेली तसा खांब वाढत होता. दुपार झाल्यानंतर खांब सुर्याच्या अगदी जवळ पोहचला. तेव्हा राजा विक्रमाचे शरीर जळून कोळसा होऊन गेले. सूर्य देवाचे लक्ष खांबाकडे गेले. तेथे जळलेल्या अवस्थेत एक मानव दिसला. तो राजा विक्रम असल्याची सूर्याला खात्री पटली.
त्याने लगेच विक्रमाच्या शरीरावर अमृत शिंपडून त्याला जिवंत केले. राजावर खूष होऊन त्याला इच्छित वस्तु प्रदान करणारे सूवर्ण कुण्डल भेंट म्हणून देऊन टाकले. तत्पश्चात सूर्यास्त होत असताना तो खांब हळू हळू लहान होऊ लागला. खांब पाण्यात विलीन झाल्यानंतर राजा विक्रम पाण्यात उतरून सरोवराच्या काठी आला. त्यानंतर दोन्ही वेताळांचे स्मरण केल्यानंतर वेताळ राजाला जंगलात सोडून दिले.
राजा विक्रम राजधानीकडे येत असताना वाटेत त्याला एक ब्राह्मण भेटला. त्याने ते कुण्डल मागितले. राजा विक्रम फारच उदार होता. त्याला त्या कुण्डलांचा कधीच मोह आला नाही. त्याने ते कुण्डल त्याला देऊन टाकले.